लिलावाद्वारे लिंबू खरेदीस नकार, श्रीगोंद्यात आडत व्यापाºयांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:49 AM2020-07-14T10:49:26+5:302020-07-14T10:50:14+5:30

श्रीगोंदा : लिंबाची लिलावाद्वारे खरेदी करण्यास व्यापाºयांनी नकार देऊन संप पुकारल्याने श्रीगोंदा बाजार समितीने ११ आडत व्यापाºयांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यांचे बाजार समितीतील भूखंडही रद्द केले आहेत. व्यापाºयांच्या संपामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.

Refusal to purchase lemons through auction, revocation of licenses of Aadat traders in Shrigonda | लिलावाद्वारे लिंबू खरेदीस नकार, श्रीगोंद्यात आडत व्यापाºयांचे परवाने रद्द

लिलावाद्वारे लिंबू खरेदीस नकार, श्रीगोंद्यात आडत व्यापाºयांचे परवाने रद्द

googlenewsNext

श्रीगोंदा : लिंबाची लिलावाद्वारे खरेदी करण्यास व्यापाºयांनी नकार देऊन संप पुकारल्याने श्रीगोंदा बाजार समितीने ११ आडत व्यापाºयांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यांचे बाजार समितीतील भूखंडही रद्द केले आहेत. व्यापाºयांच्या संपामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.


श्रीगोंदा तालुका हा राज्यातील लिंबाचे आगार म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लिंबाची शेती करतात. ही लिंब बाजार समितीत विक्रीसाठी आणली जातात. मात्र आडत व्यापारी हे लिलाव न करता थेट आपल्या मनाने भाव ठरवतात व लिंबू खरेदी करतात, अशी शेतकºयांची तक्रार आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी या विरोधात भूमिका घेतली आहे. लिलाव पद्धतीने व्यापाºयांनी लिंबू खरेदी करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे. व्यापाºयांना मात्र ही मागणी मान्य नाही.

आम्ही ठोक पद्धतीनेच खरेदी करू, अशी भूमिका व्यापाºयांनी घेतली आहे. शेतकºयांच्या मागणीनंतर लिलाव पद्धतीने लिंबू खरेदी करा, असा आदेश बाजार समितीने व्यापाºयांना दिला आहे. याविरोधात व्यापाºयांनी रविवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे रविवार व सोमवारी बाजार समितीत लिंबांची खरेदी विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे विक्री विना शेतकºयांचे उत्पादन शेतातच पडून आहे. याविरोधात संभाजी ब्रिगेडनेही बाजार समितीत धरणे आंदोलन सुरू केले होते.

या आंदोलनात टिळक भोस यांच्यासह सतीश बोरूडे, युवराज पळसकर, युवराज चिखलठाणे, अ‍ॅड. सुमीत बोरूडे, जहीर जकाते, हुसेन शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल घेत बाजार समितीने ११ आडत व्यापाºयांचे परवाने निलंबित केले आहेत. या व्यापाºयांना बाजार समितीने जे गाळे दिले होते ते गाळेही रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने आंदोलन मागे घेतले.

Web Title: Refusal to purchase lemons through auction, revocation of licenses of Aadat traders in Shrigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.