शिरसगावातील उपबाजार स्थलांतरास शेतक-यांचा नकार; शंभर रोजगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 04:11 PM2020-05-23T16:11:52+5:302020-05-23T16:12:45+5:30

सध्या ही उपबाजार समिती कायम ठेवण्यासाठी तिळवणीस नेण्यास कोपरगाव बाजार समितीचा प्रयत्न सुरु आहे. कोपरगाव बाजार समितीने तिळवणी येथे उपबाजार समिती करिता जागा खरेदी केली आहे. मात्र या स्थलांतरास शेतक-यांनी विरोध दर्शवला आहे. 

Refusal of farmers to relocate sub-markets in Shirasgaon; Time of starvation over a hundred jobs | शिरसगावातील उपबाजार स्थलांतरास शेतक-यांचा नकार; शंभर रोजगारांवर उपासमारीची वेळ

शिरसगावातील उपबाजार स्थलांतरास शेतक-यांचा नकार; शंभर रोजगारांवर उपासमारीची वेळ

Next

शिरसगाव : कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती सध्या प्रायोगिक तत्वावर दोन वर्षांपासून चालू आहे. सध्या ही उपबाजार समिती कायम ठेवण्यासाठी तिळवणीस नेण्यास कोपरगाव बाजार समितीचा प्रयत्न सुरु आहे. कोपरगाव बाजार समितीने तिळवणी येथे उपबाजार समिती करिता जागा खरेदी केली आहे. मात्र या स्थलांतरास शेतक-यांनी विरोध दर्शवला आहे. 
दोन वर्षांपासून शिरसगावात प्रायोगिक तत्त्वावर बाजार समितीतर्फे  कांदा व भुसार मालाची खरेदी केली जात आहे. शिरसगावात जवळपास १०० ते १५० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शिरसगावात उपबाजार समिती कायमस्वरूपी ठेवण्यासाठी मार्केट कमिटीची स्वत:ची जागा नसल्याने अडचण होत आहे. कमीत कमी दोन एकर जागा मिळाली तरच शिरसगावात उपबाजार समिती कायमस्वरूपी ठेवण्यात येईल असे कमिटीने शुक्रवारी २१ तारखेला झालेल्या  बैठकीमध्ये सांगितले आहे.
 शिरसगावात उपबाजार समिती कायमस्वरूपी होईल, अशा आशयावर आजूबाजूच्या व्यापाºयांनी मार्केटमधील माल खरेदी करण्यासाठी स्वत:ची जागा खरेदी केली आहे. या जागेसाठी व्यापाºयांनी लाखो रुपये गुंतवले आहे. यामुळे शिरसगावातील ग्रामस्थांनी आपल्या स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. शिरसगावात ३ ते ४ हॉटेल आहेत. यात हॉटेल व्यवसायात दररोज जवळपास लाखाच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. तरी ही उपबाजार समिती दुसरीकडे हलवू नये, असा शेतकºयांचा दबक्या आवाजात सूर उमटत आहे.


येत्या शुक्रवारपर्यंत शिरसगावात शिरसगाव उपबाजार समितीसाठी कमीत कमी दोन एकर जागा कायमस्वरूपी दिली तर शिरसगावात उपबाजार समिती कायम ठेवण्यात येईल, असे कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजी रक्टाटे यांनी सांगितले.


शिरसगावात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचा प्रपंच सुखरूप चालू आहे. बाजार समिती दुसरीकडे गेल्यास रोजगारांवर उपासमारीची वेळ येईल, असे ग्रामपंचायत सदस्य कैलास मढवे यांनी सांगितले.  
 

Web Title: Refusal of farmers to relocate sub-markets in Shirasgaon; Time of starvation over a hundred jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.