नगर अर्बन बँकेला आरबीआयचा 40 लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:52 AM2020-05-30T09:52:49+5:302020-05-30T09:52:57+5:30

अहमदनगर: येथील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)  40 लाख रुपयांचा दंड केला आहे आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने हा दंड करण्यात आला आहे.

RBI fines Nagar Urban Bank Rs 40 lakh | नगर अर्बन बँकेला आरबीआयचा 40 लाखांचा दंड

नगर अर्बन बँकेला आरबीआयचा 40 लाखांचा दंड

Next

अहमदनगर: येथील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)  40 लाख रुपयांचा दंड केला आहे आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने हा दंड करण्यात आला आहे.

अर्बन बँकेचे 31 मे 2018 पूर्वीचे जे लेखापरीक्षण करण्यात आले त्या लेखा परीक्षणामध्ये बँकेचे उत्पन्न व दिलेल्या कर्जाची थकबाकी याबाबत आरबीआयची जी नियमावली आहे त्या नियमावलीचे पालन करण्यात आलेले नाही, असे आढळून आले आहे. आरबीआयच्या IRAC (Income recognisation and asset classification) या तरतुदीचे पालन केले नाही असे आरबीआयचे म्हणणे आहे. 27 मे रोजी आरबीआयने हा दंडाचा आदेश काढला आहे. अनिमित कारभारामुळे अर्बन बँकेवर सध्या प्रशासक कार्यरत आहे. त्यातच बँकेला हा नवीन धक्का बसला आहे. 40 लाख रुपये दंड हा खूप मोठा दंड आहे असे बँकिंग क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: RBI fines Nagar Urban Bank Rs 40 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.