कोरोनामुळे रसवंतीचा गाडा न फिरताच कोलमडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:05 AM2020-05-26T11:05:58+5:302020-05-26T11:06:45+5:30

यंदा हंगाम सुरू करण्याच्या मुहूर्तावरच कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच उद्योगधंदे बंद करण्यात आले. सद्यस्थितीला चौथ्या लॉकडाऊनमध्येही हॉटेल, शीतपेय व रसवंतीगृहाला परवानगी नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा न फिरताच कोलमडल्याचे दिसते.

Raswanti's car crashed without moving due to corona ... | कोरोनामुळे रसवंतीचा गाडा न फिरताच कोलमडला...

कोरोनामुळे रसवंतीचा गाडा न फिरताच कोलमडला...

Next

संजय सुपेकर । 
बोधेगाव : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की रसवंतीगृहावर गर्दी पाहायला मिळत असते. परंतु, यंदा हंगाम सुरू करण्याच्या मुहूर्तावरच कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच उद्योगधंदे बंद करण्यात आले. सद्यस्थितीला चौथ्या लॉकडाऊनमध्येही हॉटेल, शीतपेय व रसवंतीगृहाला परवानगी नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा न फिरताच कोलमडल्याचे दिसते.

शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह परिसरातील बालमटाकळी, चापडगाव, लाडजळगाव, हातगाव, कांबी, मुंगी आदी गावात अनेक बेरोजगार तरूण उन्हाळ्यात रसवंतीचा व्यवसाय करतात. काही व्यवसायिकांनी फेब्रुवारी दरम्यान रसवंती गृह उभारली तर काहींनी सुरूवातीला ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा चटका वाढल्यानंतर मार्च महिन्यात रसवंतीगृह चालू केले. परंतु, कोरोनाचा कहर वाढतच असल्याने प्रशासनाने २३ मार्चला लॉकडाऊन घोषित करून सर्वच उद्योग-व्यवसाय बंद केले. दोन महिन्यानंतर आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यासाठी चौथ्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश उद्योगधंद्यांना उघडण्यास सध्या परवानगी मिळाली आहे. मात्र यामध्ये रसवंतीगृहाचा समावेश नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा हंगाम आवरत आला तरी अद्यापही सुरू करता आलेला नाही.

बोधेगावात शासकीय डाकबंगला परिसरातील गॅरेज कॅम्पसजवळ सोनविहीर येथील अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब विखे यांनी मार्चमध्ये जवळपास ३० ते ४० हजार रूपये खर्चून रसवंतीसाठी लाकडी चरक असलेला गाडा बसवला होता. परंतु, बैल जुंपून चरक फिरण्याआधीच लॉकडाऊन घोषित झाले. साधारणत: दोन महिने उलटले तरी उद्योग करता न आल्याने त्यांना जमिनीत गाडलेला लाकडी चरक पावसापाण्यात खराब होऊ नये म्हणून सोमवारी (दि.२५) काढून घ्यावा लागला आहे. या व्यवसायात हजारो रूपयांची गुंतवणूक करून उद्योग बंदच राहिल्याने रसवंतीगृह व्यवसायिक मात्र अडचणीत सापडले आहेत. तर रसवंतीसाठी ऊस लागवड केलेल्या शेतक-यांनाही याची झळ बसली आहे. 


रसवंती चालू करण्यासाठी व्याजाने पैसे काढून पाथर्डी तालुक्यातून नवा लाकडी चरक विकत आणला. चरक फिरायला एक बैलही उपलब्ध केला. परंतु लॉकडाऊन मुळे चरक बिंगलाच नाही. यामुळे मोठी आर्थिक झळ बसली आहे.
    - बाबासाहेब विखे, रसवंती व्यवसायिक, सोनविहीर, ता. शेवगाव 

Web Title: Raswanti's car crashed without moving due to corona ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.