रेल्वे वाहतूक गुरुवारी मध्यरात्री होणार पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 12:11 PM2020-12-23T12:11:19+5:302020-12-23T12:12:05+5:30

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) :  दौड मनमाड लोहमार्गावर बुधवारी रात्री  मालगाडीचे ४२ पैकी १२डबे घसरले आहेत.  रेल्वेचे सोलापूर विभागाचे शैलेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे आपत्ती व्यवस्थापन टीमने लोहमार्ग दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेतले आहे.

Rail traffic will resume at midnight on Thursday | रेल्वे वाहतूक गुरुवारी मध्यरात्री होणार पूर्ववत

रेल्वे वाहतूक गुरुवारी मध्यरात्री होणार पूर्ववत

Next

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) :  दौड मनमाड लोहमार्गावर बुधवारी रात्री  मालगाडीचे ४२ पैकी १२डबे घसरले आहेत.  रेल्वेचे सोलापूर विभागाचे शैलेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे आपत्ती व्यवस्थापन टीमने लोहमार्ग दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे गुरूवारी मध्यरात्री  वाहतुक पुर्ववत सुरू होणार आहे. 

बुधवारी रात्री १२ वाजून पाच मिनिटानी श्रीगोंदा रेल्वे स्टेशन पासुन दोन किमी अंतरावर म्हातारपिंप्री श्रीगोंदा शिवारात सिमेटने भरलेल्या मालगाडीचे डबे घसरले. हा अपघात का झाला यावर रेल्वेने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. 

 मालगाडी सोलापुर दौड मार्गे नगर कडे चालली होती श्रीगोंदा रेल्वे स्टेशन पास केले आणि हा अपघात झाला. या अपघातात जीवीत हानी झालेली नाही. मात्र रेल्वेची वित्तीय हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. 
 
दौड मनमाड  लोहमार्गावरील प्रवाशी वाहतुक करणाऱ्या उत्तर भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेस मनमाड मार्गे मुंबईकडे तर दक्षिण भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेस कुर्डूवाडी मार्गे वळविण्यात आल्या आहे. एकही प्रवाशी रेल्वे रद्द करण्यात आलेली मात्र वाहतुक विस्कळीत झालेली आहे 
---
मालगाडीचा अपघात कशामुळे झाला हे अभ्यास केल्यानंतर स्पष्ट होईल अगोदर दुरुस्तीचे काम पुर्ण करून वाहतूक सुरळीत करणे महत्त्वाचे आहे  गुरुवारी रात्री वाहतूक पुर्ववत सुरू होणार आहे 
शैलेश गुप्ता 
व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे विभाग

Web Title: Rail traffic will resume at midnight on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.