Raid on sand smuggling in Wangdari; 27 lakh worth of property confiscated | वांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त 

वांगदरीत वाळू तस्करीवर छापा; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त 

श्रीगोंदा :  तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडीजवळ घोडनदीपत्रात पोलिसांंनी छापा टाकून अवैध वाळू चोरी करणारे तीन ट्रक, चार ब्रास वाळू असा एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (९ आॅगस्ट) मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई केली. 

पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक एम.एच.१२, डिटी ९९८१ याचा चालक, मालक बालाजी केंद्रे (रा.चंदननगर, जि. पुणे), ट्रक क्रमांक एम. एच. ४२, बी.-९२६० वरील चालक, मालक, ट्रक क्रमांक एम. एच.१६, एई-७३७७ वरील चालक मालक यांच्याविरोधात विनापरवाना बेकायदा अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक दौलतराव पवार मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, 
पो. कॉ.अमोल आजबे,पो. कॉ. प्रताप देवकाते, पो. कॉ. कुलदीप घोळवे, पो. कॉ. इंगवले या पोलीस पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Raid on sand smuggling in Wangdari; 27 lakh worth of property confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.