मुळा, भंडारदरा पाणलोटात आषाढ सरी कोसळल्या; घाटघरला १२५, रतनवाडीला १०९ मिलीमिटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 04:14 PM2020-07-06T16:14:28+5:302020-07-06T16:15:16+5:30

अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोटातील हरिश्चंगड-रतनगड-घाटघर-कळसुबाई परिसरात उत्तराषाढाच्या जोरदार सरी कोसळल्या. घाटघर येथे १२५ तर रतनवाडी येथे १०९ ...

Radish, Ashadh showers fell in Bhandardara watershed; Ghatghar received 125 mm of rain and Ratanwadi received 109 mm of rain | मुळा, भंडारदरा पाणलोटात आषाढ सरी कोसळल्या; घाटघरला १२५, रतनवाडीला १०९ मिलीमिटर पाऊस

मुळा, भंडारदरा पाणलोटात आषाढ सरी कोसळल्या; घाटघरला १२५, रतनवाडीला १०९ मिलीमिटर पाऊस

googlenewsNext

अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोटातील हरिश्चंगड-रतनगड-घाटघर-कळसुबाई परिसरात उत्तराषाढाच्या जोरदार सरी कोसळल्या. घाटघर येथे १२५ तर रतनवाडी येथे १०९ मिलीमिटर पाऊस झाला. भंडारदरा धरणात रविवारी १९७ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील डोंगर शिखरांशी ढगांची झुंबी होत मान्सून सक्रिय झाला आहे. भात खाचरांमध्ये पाणी साठले आहे. यामुळे भात रोपांच्या आवणीला वेग आला आहे.
भंडारदरा धरणात रविवारी नव्या १९७ तर १ जून २०२० पासून १ हजार २२३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. १९८ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबीत व ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तालुक्यातील इतर तेरा छोटे लघुपाटबंधारे प्रकल्प ही लवकरच ओसंडीतील अशी आशा बळावली आहे.
भंडारदराधरणात ३ हजार ८४ दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात ४ हजार ७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आजमितीस आहे. १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणात ३८५ पाणीसाठा आहे. मुळा धरणाचा सध्याचा पाणीसाठा ७ हजार ७८० दशलक्ष घनफूट असून यंदा केवळ १ हजार १६७ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक आतापर्यंत झाली आहे.
पावसाची सोमवारी झालेली नोंद व यंदा १ जूनपासून पडलेला पाऊस असा- घाटघर-१२५/११०२, रतनवाडी- १०९/७५३, पांजरे- ७५/२९२, भंडारदरा- ६५/५४१, वाकी- ४३/४३०, निळवंडे- २८/३६९ मी.मी.

Web Title: Radish, Ashadh showers fell in Bhandardara watershed; Ghatghar received 125 mm of rain and Ratanwadi received 109 mm of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.