कुकडी, विसापूरचे आवर्तन तातडीने सोडा; राजेंद्र नागवडे यांची जलसंपदामंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:08 PM2020-05-29T17:08:38+5:302020-05-29T17:09:33+5:30

कुकडी लाभक्षेत्रातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी कुकडी व विसापूर कालव्यांचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Quickly release the cycle of Kukdi, Visapur; Letter of Rajendra Nagwade to the Minister of Water Resources | कुकडी, विसापूरचे आवर्तन तातडीने सोडा; राजेंद्र नागवडे यांची जलसंपदामंत्र्यांना पत्र

कुकडी, विसापूरचे आवर्तन तातडीने सोडा; राजेंद्र नागवडे यांची जलसंपदामंत्र्यांना पत्र

googlenewsNext

श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शेतक-यांचे नुकसान टाळण्यासाठी कुकडी व विसापूर कालव्यांचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मे महिना संपत आला असून जून महिना आला आहे. मात्र तरीही विसापूरच्या लाभधारकांना सतत मागणी करूनही आवर्तन मिळालेले नाही. येथील शेती व शेतकरी संकटात सापडला आहे. उभी पिके, फळबागा व चारा पिके पाण्याअभावी जळण्याची भीती आहे. शेतकºयांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सध्या कुकडी व विसापूरचे आवर्तन सुटणे गरजेचे बनले आहे. लाभक्षेत्रातील पाणी पातळीत घट झाली असल्याने शेतकºयांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. डिंभे धरणातील पाणी येडगावमध्ये सोडून कुकडीचे आवर्तन तातडीने सोडावे, कुकडीचे एक आवर्तन मिळाल्यास लाभक्षेत्रातील चारा पिके, फळबागा, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे नागवडे यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Quickly release the cycle of Kukdi, Visapur; Letter of Rajendra Nagwade to the Minister of Water Resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.