शास्तीमाफीनंतर कर भरण्यासाठी महापालिकेत नागरिकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:43 AM2020-11-04T11:43:42+5:302020-11-04T11:45:48+5:30

महापालिकेने शास्ती माफी जाहीर केल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी सर्वाधिक ६३ लाख रुपयांचा कर वसूल झाला असून, गेल्या दोन दिवसांत मनपाच्या तिजोरीत एक कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळला आहे.

Queues of citizens in the Municipal Corporation to pay taxes after amnesty | शास्तीमाफीनंतर कर भरण्यासाठी महापालिकेत नागरिकांच्या रांगा

शास्तीमाफीनंतर कर भरण्यासाठी महापालिकेत नागरिकांच्या रांगा

Next

 

अहमदनगर : महापालिकेने शास्ती माफी जाहीर केल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी सर्वाधिक ६३ लाख रुपयांचा कर वसूल झाला असून, गेल्या दोन दिवसांत मनपाच्या तिजोरीत एक कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळला आहे.

महापालिकेने ७५ टक्के शास्ती माफ करण्याची घोषणा केली. ही सवलत जाहीर करण्यापूर्वी दररोज १५ ते २० लाखांची वसुली होत होती. शास्ती माफी केेल्याने वसुलीचा आकडा ६० लाखांवर पोहोचला आहे. पहिल्या दिवशी सोमवारी ४३ लाखांची वसुली झाली. दुसऱ्या दिवशी सावेडी, शहर, बुरुडगाव आणि झेंडीगेट या प्रभाग कार्यालयात एकूण ६२ लाख ९१ हजार रुपयांची वसुली झाली.

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. परंतु, वसुली मोहीम थंडावल्याने सानुग्रह अनुदान देणे पालिकेला शक्य नव्हते. कर वसुलीला वेग आल्याने कर्मचाऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Queues of citizens in the Municipal Corporation to pay taxes after amnesty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.