दोन वर्षांपासून सार्वजनिक शौचालये कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:05+5:302021-03-07T04:20:05+5:30

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील सार्वजनिक शौचालये मागील दोन वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ‘हागणदारीमुक्त गाव’ ...

Public toilets have been locked for two years | दोन वर्षांपासून सार्वजनिक शौचालये कुलूपबंद

दोन वर्षांपासून सार्वजनिक शौचालये कुलूपबंद

Next

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील सार्वजनिक शौचालये मागील दोन वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ‘हागणदारीमुक्त गाव’ योजनेला काही प्रमाणात हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

पिंपळगाव माळवी हे आठ हजार लोकसंख्येचे गाव असून, ते शासकीय दप्तरी हागणदारीमुक्त झाले आहे. शासनाच्या सुलभ शौचालय योजनेचा बहुतांश नागरिकांनी लाभ घेतला असून, वैयक्तिक शौचालय बांधले आहेत; परंतु, काही नागरिकांना जागेची अडचण किंवा आर्थिक परिस्थितीमुळे व्यक्तिगत शौचालय बांधता आले नाहीत, अशा नागरिकांचीही अडचण लक्षात घेऊन पिंपळगाव माळवी येथील अवतार मेहेरबाबा ट्रस्ट यांनी दोन वर्षांपूर्वी गावामध्ये सर्व सुविधायुक्त चार शौचालये बांधून दिली आहेत. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापपर्यंत ही शौचालये ग्रामस्थांसाठी खुले करून दिली नाहीत. त्यामुळे काही नागरिकांना अद्यापही उघड्यावर शौचास जावे लागते. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना दुर्गंधी व आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनालाही आता याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन मश्गुल असल्यामुळे पिंपळगाव माळवी भागात हागणदारीमुक्तीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.

--

पिंपळगाव माळवी येथील सार्वजनिक शौचालये गावांतील गरजू व्यक्तींना लवकरच वापराकरिता देण्यात येणार आहेत. कोविड आजारामुळे ही शौचालये वापरास दिली नव्हती. नागरिकांनी शौचालय स्वच्छ ठेवावे.

- दत्तात्रय शेळके,

ग्रामविकास अधिकारी, पिंपळगाव माळवी

----

०६ कुलूपबंद

पिंपळगाव माळवी येथील सार्वजनिक शौचालये दोन वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत आहेत.

Web Title: Public toilets have been locked for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.