महानायकाची स्वप्नवत भेट अनुभवणारा प्राध्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:03 PM2019-09-15T12:03:50+5:302019-09-15T12:05:19+5:30

बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपले. चुलत्यांनी समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ओटीत मुलगा टाकला. सिंधुताईंच्या मार्गदर्शनाने हाच मुलगा पुढे प्राध्यापक झाला. आणि आपल्या कुटुंबीयांसोबत ‘कौन बनेगा करोडपती’च्या व्यासपीठावरही पोहोचला. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जवळपास सात मिनिटे संवाद साधला.

Professor who dreamed of a dream director | महानायकाची स्वप्नवत भेट अनुभवणारा प्राध्यापक

महानायकाची स्वप्नवत भेट अनुभवणारा प्राध्यापक

googlenewsNext

गणेश आहेर। 
लोणी : बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपले. चुलत्यांनी समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ओटीत मुलगा टाकला. सिंधुताईंच्या मार्गदर्शनाने हाच मुलगा पुढे प्राध्यापक झाला. आणि आपल्या कुटुंबीयांसोबत ‘कौन बनेगा करोडपती’च्या व्यासपीठावरही पोहोचला. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जवळपास सात मिनिटे संवाद साधला. या व्यक्तिमत्त्वाचे नाव उत्तम ओंकारजी येवले होय. 
 ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुताई यांनी घडविलेल्या हजारो मुलांपैकी दहा निवडक मुलांना कार्यक्रमात सहकुटुंब निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन यांनी आश्चर्यकारकपणे मूळचे शहापूर (ता.चिखलदरा,ता.अमरावती) येथील आणि सध्या लोणी खुर्द (ता.राहाता) येथे वास्तव्यास असलेल्या प्रा.येवले, पत्नी सुनंदा, मुली गायत्री व दीपाली यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सिंधुताई यांच्याबद्दल आठवणी प्रा.येवले यांच्याकडून वदवून घेतले. सात मिनिटे प्रा.येवले यांच्याशी बच्चन यांनी दिलखुलासपणे संवाद साधला. 
या संवादाच्या दरम्यान महाराष्ट्रीयन असूनही स्वच्छ हिंदी भाषा बोलल्याबद्दल बिग बीं कडून कौतुकाची थाप मिळाली. येवले यांच्यासाठी हे सारं स्वप्नवतच होते. येवले लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात हिदीं विषयाचे प्राध्यापक आहेत.  
आई -वडील डोळे उघडायच्या आतच गेले.  सिंधुताई अर्थात माझी माईच माझं सर्वस्व आहे. माईमुळेच महानायकाला पाहण्याचा, भेटण्याचा अन बोलण्याचा योग आला. माझ्यासाठी हे सारे काही स्वप्नंवतच होते, असे प्रा. उत्तम येवले यांनी सांतिगले. 
    पतीमुळे मला महानायकाला भेटण्याचा योग आला. महानायकातील महामाणूस मी अनुभवला. आमच्या दोन मुली आमच्याशिवाय राहू शकत नाही हे जेव्हा महानायकाला समजले तर त्यांनी मुलींनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली, असे सुनंदा येवले यांनी सांगितले.
 

Web Title: Professor who dreamed of a dream director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.