साईनगरीत कोवीड रूग्णालयात खासगी डॉक्टर्स सेवा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:35 PM2020-10-21T12:35:18+5:302020-10-21T12:35:30+5:30

साईनगरीतील साईबाबा कोवीड उपचार केंद्रात जवळपास पंधरा खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजुनही अनेक जण इच्छुक असल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले़.

Private doctors will provide services at Kovid Hospital in Sainagar | साईनगरीत कोवीड रूग्णालयात खासगी डॉक्टर्स सेवा देणार

साईनगरीत कोवीड रूग्णालयात खासगी डॉक्टर्स सेवा देणार

Next

शिडी : साईनगरीतील साईबाबा कोवीड उपचार केंद्रात जवळपास पंधरा खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजुनही अनेक जण इच्छुक असल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले़.

    तहसिलदार हिरे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ प्रमोद म्हस्के, डॉ़ गोकूळ घोगरे, डॉ़ स्वाती म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थीतीत बुधवारी तालुक्यातील डॉक्टरांची या संदर्भात बैठक घेण्यात आली़. यावेळी सर्वच डॉक्टरांनी साईदरबारी आनंदाने रूग्णसेवा करण्याची तयारी दर्शवली़.

यावेळी डॉ़. शुभांगी कान्हे, डॉ़. शिला पठारे, डॉ़. दत्ता कानडे, डॉ़. डी़. एस़. खंडीझोड, डॉ़. बी़.डी़. महामिने, डॉ़. डी़.बी़. महामिने, डॉ़. मृणाल खर्डे, डॉ़. अमोल पोकळे, डॉ़. किरण गोरे, डॉ़. संतोष मैड, डॉ़. यु़आऱ शिंदे, डॉ़. मिलींद नाईक, डॉ़. विजय म्हस्के, डॉ़. वैभव मालकर, डॉ़. अतुल गुळवे आदींची उपस्थीती होती़

 सामाजिक जाणीवेबरोबरच साईबाबांचा रूग्णसेवेचा वसा जपण्यासाठी हे डॉक्टर्स साईबाबा कोवीड उपचार केंद्रात सेवा देणार आहेत़. या डॉक्टरांना आठवड्यातून एक दिवस आठ तास सेवा द्यावी लागणार आहे़. सध्या कोवीड रूग्णांचे प्रमाण कमी झाले असून कदाचित महिन्यातून प्रत्येकाला एक किंवा दोन दिवस येथे सेवा द्यावी लागणार आहे़.
 

Web Title: Private doctors will provide services at Kovid Hospital in Sainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.