मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाची हजेरी, धरणातून पुन्हा दोन हजार क्‍युसेकने पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:44 PM2020-10-15T14:44:40+5:302020-10-15T14:45:21+5:30

                 दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर काल पावसाने हजेरी लावली. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा  धरणातून 2000 क्‍युसेकने 11 मोरया द्वारे जायकवाडी कडे झेपावले आहे.

Presence of rains on the catchment area of Mula Dam, again released two thousand cusecs of water | मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाची हजेरी, धरणातून पुन्हा दोन हजार क्‍युसेकने पाणी सोडले

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाची हजेरी, धरणातून पुन्हा दोन हजार क्‍युसेकने पाणी सोडले

googlenewsNext

  राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर काल पावसाने हजेरी लावली. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा  धरणातून 2000 क्‍युसेकने 11 मोरया द्वारे जायकवाडी कडे झेपावले आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. मुळा धरण शंभर टक्के भरले आहे .कोतूळ येथून पाण्याची आवक  पूर्णपणे बंद आहे. तर पारनेर भागातून दोन हजार क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. कोतुळ येथे आत्तापर्यंत 862 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुलानगर येथे 1030 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मुळा धरणात यंदाच्या पावसाळ्यात 35540 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी आले आहे. त्यापैकी 14000 टीएमसी पाणी जायकवाडीला गेले आहे. व डाव्या कालव्यातून 200 दशलक्ष घनफूट इतके पाणी वाहिले . मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून 250 क्‍युसेकने पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. डावा कालवा बंद आहे.

लाभ क्षेत्रातील पावसाची आकडेवारी

 कोतुळ 862 मिलिमीटर, मुलानगर 1030 मिलिमीटर, राहुरी 1026 मिलिमीटर, वांबोरी 986 मिलिमीटर, घोडेगाव 1105 मिलिमीटर, सोनई 1132 मिलिमीटर , नेवासा 1182 मिलिमीटर, वडाळा 1264 खडका860 मिलिमीटर 

-अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण अभियंता

Web Title: Presence of rains on the catchment area of Mula Dam, again released two thousand cusecs of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.