दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले; दोन जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:45 AM2019-10-14T11:45:42+5:302019-10-14T11:46:13+5:30

नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना रविवारी रात्री नेवासा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले.  जॉकी रमेश चांदणे, राजू अजिज शेख, मुस्तफा गफुर बागवान (सर्व रा.नेवासा) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचा साहित्य जप्त केले असून दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.

Police arrested three accused in connection with the robbery; The two escaped | दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले; दोन जण फरार

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले; दोन जण फरार

googlenewsNext

 नेवासा : नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना रविवारी रात्री नेवासा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. 
जॉकी रमेश चांदणे, राजू अजिज शेख, मुस्तफा गफुर बागवान (सर्व रा.नेवासा) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचा साहित्य जप्त केले असून दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
नेवासा फाटा येथे रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक भारत दाते, पोलीस उपनिरीक्षक पी. के.शेवाळे, तपास पथकाचे विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गीते, सुहास गायकवाड, राहुल यादव यांना रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद रोडवर पायल हॉटेलजवळ पाच इसम हातात लाकडी दांडके घेवून मोटारसायकलसह दरोडा टाकण्याचे उद्देशाने उभे असलेले दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यामधील तीन इसमांना पकडले. बाकी दोन इसम हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. पकडलेल्या तिघांची विचारणा केली असता जॉकी रमेश चांदणे, राजू अजिज शेख, मुस्तफा गफूर बागवान (सर्व रा.नेवासा) अशी त्यांनी नावे सांगितले. पळून गेलेल्या दोघांबद्दल विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याजवळ असलेली यामा कंपनीची आर-१ मोटारसायकल (क्रमांक-एम.एच.-२०, एफ.सी.-८९९२) याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या तिघांकडून लाकडी दांडके व जॉकी चांदणे याच्या पँटच्या खिशात मिरची पूड असे दरोडा टाकण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस नाईक जयवंत तोडमल यांच्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Police arrested three accused in connection with the robbery; The two escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.