पिंपळगाव माळवीत नदीपात्र खोलीकरणही पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:46+5:302021-06-22T04:15:46+5:30

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवीत मेहेरबाबा ट्रस्टच्या मदतीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. नदीपात्र खोलीकरणही पूर्णत्वाकडे गेले ...

Pimpalgaon Malvit river basin deepening is also nearing completion | पिंपळगाव माळवीत नदीपात्र खोलीकरणही पूर्णत्वाकडे

पिंपळगाव माळवीत नदीपात्र खोलीकरणही पूर्णत्वाकडे

Next

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवीत मेहेरबाबा ट्रस्टच्या मदतीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. नदीपात्र खोलीकरणही पूर्णत्वाकडे गेले आहे.

येथील ग्रामस्थांनी मागील वर्षीपासून सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी लोकवर्गणीतून व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून सीना नदी खोलीकरण कामास सुरुवात केली आहे. पिंपळगाव माळवी हद्दीतील नदीपात्र खोलीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.

या सीना नदी खोलीकरण कामासाठी अवतार मेहेरबाबा ट्रस्ट, मेहेराझाद यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे.

या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी अडविण्यास मदत होणार असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यात मदत होणार आहे, तसेच या नदीकाठी राहणाऱ्या दोनशे कुटुंबांच्या रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी रस्ते तयार करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दूध व शेतमाल बाजारपेठेत नेण्यास येणारी समस्या दूर झाली आहे. या नदी खोलीकरणामुळे परिसरातील शेकडो एकर शेतजमिनीस फायदा होणार आहे.

पिंपळगाव माळवी परिसर पूर्वीपासून फळे व भाजीपाला पिकविणारा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. येथील तलावामुळे परिसर शेतीला पाणी उपलब्ध आहे; परंतु तलाव कोरडा पडल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था बिकट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा निश्चय केला आहे. गावातील युवक वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग दिल्यामुळे नदी खोलीकरणाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. या दुसऱ्या टप्प्यातील नदी खोलीकरण कामासाठी पिंपळगाव माळवीच्या सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच भारती बनकर, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, मच्छिंद्र झिने, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय शेळके, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.

---

२१ पिंपळगाव माळवी

पिंपळगाव माळवी येथील सीना नदी खोलीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.

Web Title: Pimpalgaon Malvit river basin deepening is also nearing completion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.