राहाता, कोपरगाव तालुक्यात ऑक्सीजनची आणीबाणी; काही तास पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:21 PM2021-04-26T17:21:47+5:302021-04-26T17:22:41+5:30

शिर्डी : संगमनेर, सिन्नर येथून ऑक्सीजन सिलींडर मिळणे बंद झाल्याने शिर्डी व राहात्यातील खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण ...

Oxygen emergency in Rahata, Kopargaon taluka; Just enough oxygen for a few hours | राहाता, कोपरगाव तालुक्यात ऑक्सीजनची आणीबाणी; काही तास पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक

राहाता, कोपरगाव तालुक्यात ऑक्सीजनची आणीबाणी; काही तास पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक

Next

शिर्डी : संगमनेर, सिन्नर येथून ऑक्सीजन सिलींडर मिळणे बंद झाल्याने शिर्डी व राहात्यातील खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी रूग्णालयांकडे काही तास पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक असून साईबाबा संस्थानमध्ये बेडच शिल्लक नाही.

एकीकडे रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असतांना ऑक्सीजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहाता व कोपरगावातील रूग्णालयांनी ऑक्सीजन आवश्यक असणारे पेशंट अ‍ॅडमीट करून घेणे थांबवले आहे. तर अन्य रूग्णांना इतरत्र हलवण्याच्या सुचना रूग्णालयांनी नातेवाईकांना दिल्या आहेत. ज्या रूग्णालयांकडे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर आहेत, त्यांच्याकडे सौम्य व मध्यम ऑक्सीजनची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांवर उपचार करणे शक्य आहे. मात्र गंभिर रूग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिर्डी, कोपरगाव, राहाता येथे संगमनेर येथून ऑक्सीजन सिलींडरचा पुरवठा होतो. कोपरगावला दोन सब एजन्सी असुन त्यांना सिन्नर, संगमनेरमधून पुरवठा होतो. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हा पुरवठा थांबवण्यात आला आहे. संगमनेर येथील रूग्णालयांनाही पुरेसा ऑक्सीजन मिळेनासा झाल्याने संगमनेरकरांनी बाहेर ऑक्सीजन देणे थांबवले आहे. यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील रूग्णालयेच व्हेंटीलेटरवर गेली आहेत. यातील काही रूग्णांलयाकडे सायंकाळपर्यत तर काहींकडे रात्रीपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक आहे.

प्रांताधिकार गोविंद शिंदे, राहाता तहसिलदार कुंदन हिरे हे ऑक्सजीन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पाठपुराव्यानंतर नगरवरून थोडे सिलींडर मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र संबधित प्लॅन्टसमोर ऑक्सीजनसाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे तेथूनही ऑक्सिजन मिळेल की नाही, याची खात्री नाही.

ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगमनेरच्या पुरवठादाराने नकार दिला आहे.औरंगाबाद जिल्हाधिकार्यांशी संपर्क केला आहे. ते पन्नास सिलींडर देणार आहेत. काही दिवस रोज पुरवठा करण्याबाबत त्यांना विनंती केली आहे. पोकळे यांच्या प्लॅन्टला लिक्वीड मिळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

-गोविंद शिंदे, प्रांताधिकारी

Web Title: Oxygen emergency in Rahata, Kopargaon taluka; Just enough oxygen for a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.