...अन्यथा संगमनेरात लॉकडाऊन करावाच लागेल; कसलीच तडजोड नाही, बाळासाहेब थोरात यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 04:57 PM2020-07-19T16:57:15+5:302020-07-19T16:58:52+5:30

लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून संगमनेर तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू  आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही तर लॉकडाऊन करावाच लागेल, असे  महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

... otherwise the confluence will have to be lockeddown; No compromise, warns Balasaheb Thorat | ...अन्यथा संगमनेरात लॉकडाऊन करावाच लागेल; कसलीच तडजोड नाही, बाळासाहेब थोरात यांचा इशारा

...अन्यथा संगमनेरात लॉकडाऊन करावाच लागेल; कसलीच तडजोड नाही, बाळासाहेब थोरात यांचा इशारा

googlenewsNext

संगमनेर : लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून संगमनेर तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू  आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही तर लॉकडाऊन करावाच लागेल, असे  महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  रविवारी (१९ जुलै) येथील शॅम्प्रो संस्थेच्या प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. बकरी ईद असेल किंवा गणेशोत्सव कोणतेही सण, उत्सव काळजीपूर्वक साजरे करावेत. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यात कुठलीही तडजोड करून चालणार नाही, असेही ते म्हणाले. 

याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, एसएमबीटी संस्थेचे विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, नायब तहसीलदार सुधाकर सातपुते उपस्थित होते. 

Web Title: ... otherwise the confluence will have to be lockeddown; No compromise, warns Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.