राळेगणसिद्धीत विरोधक आले एकत्र; अपक्षही उतरले मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 03:15 AM2021-01-14T03:15:00+5:302021-01-14T03:15:14+5:30

एकमेकांचे विरोधक असलेले लाभेश औटी व जयसिंग मापारी यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ते दोघेही एकत्र आले. मात्र काही लोकांना निवडणुकीसाठी उभे राहायचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले

Opponents came together in Ralegan Siddhi; Independents also took to the field | राळेगणसिद्धीत विरोधक आले एकत्र; अपक्षही उतरले मैदानात

राळेगणसिद्धीत विरोधक आले एकत्र; अपक्षही उतरले मैदानात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात चक्क एकच पॅनल यंदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. राळेगणसिद्धीच्या इतिहासात प्रथमच दोन्ही विरोधकांनी एकत्र येऊन एकच पॅनल उभे केले आहे; तर या पॅनलविरोधात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांनीही साध्या पद्धतीने प्रचार करीत टीका टाळत विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला. 

एकमेकांचे विरोधक असलेले लाभेश औटी व जयसिंग मापारी यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ते दोघेही एकत्र आले. मात्र काही लोकांना निवडणुकीसाठी उभे राहायचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. निवडणूक काळात गावात एकही जेवणावळ झाली नाही. अपक्षांविरोधात पॅनलचे उमेदवार अशी निवडणूक राळेगणसिद्धी गावाने प्रथमच अनुभवली. औटी-मापारी यांनी त्यांच्या पॅनलचे फ्लेक्स लावले तर काही अपक्ष उमेदवारांनीही फ्लेक्स लावले. गावात प्रचारासाठी एकही वाहन धावले नाही.

Web Title: Opponents came together in Ralegan Siddhi; Independents also took to the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.