भाव गडगडताच बंद पाडला कांदा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:35 AM2021-01-12T11:35:26+5:302021-01-12T11:36:17+5:30

शेवगाव येथील बाजार समितीत सोमवारी सकाळी झालेल्या लिलावात कांद्याला दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते.

Onion auction closed as soon as prices fell | भाव गडगडताच बंद पाडला कांदा लिलाव

भाव गडगडताच बंद पाडला कांदा लिलाव

Next

शेवगाव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळी झालेल्या लिलावात कांद्याला दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते. काही वेळानंतर भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे व बाजार समितीचे सभापती ॲड. अनिल मडके, सचिव यांनी दर वाढविण्याच्या मध्यस्थीने पुन्हा लिलाव सुरू झाले.

बाजार समितीच्या आवारात नेहमीप्रमाणे सोमवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, कडा, आष्टी, धामणगाव आदी ठिकाणाहून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी आला होता. दुपारी १२ वाजता कांदा लिलाव सुरू झाला असताना व्यापाऱ्यांनी एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपये असा कमी दराने लिलाव सुरू केला. दोन व तीन नंबर कांद्याच्या भावालाही गळती लावली. इतर ठिकाणी झालेला लिलाव पाहता हे दर न परवडणारे असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. त्यांनी हा लिलाव बंद पाडले.

याबाबत काही शेतकऱ्यांनी माजी आ. चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याशी संपर्क साधला. घुले यांनी फोनवर भाव वाढून देण्याबाबत व्यापाऱ्यांना तंबी दिली, तर अरुण मुंडे यांनी तातडीने बाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व व्यापाऱ्यांसोबत भाववाढ देण्याबाबत चर्चा केली.

बाजार समितीचे सभापती अनिल मडके, सचिव अविनाश म्हस्के यांनीही व्यापाऱ्यांना भाववाढीच्या सूचना दिल्याने लिलाव पूर्ववत सुरू झाले.

फेरलिलावात एक नंबर कांद्याचा ३ हजार ते ३ हजार २००, दोन नंबर कांद्याला २ हजार ६०० ते २ हजार ९०० तर तीन नंबरला १ हजार २०० असा लिलाव झाला. येथे ८ हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती.

 

Web Title: Onion auction closed as soon as prices fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.