नगर-औरंगाबाद रोडवर कंटेनर-कार अपघातात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:27 PM2019-11-06T18:27:19+5:302019-11-06T18:27:59+5:30

कंटेनर-कार अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.

One killed in container-car accident on Nagar-Aurangabad Road; One was injured | नगर-औरंगाबाद रोडवर कंटेनर-कार अपघातात एक ठार; एक जखमी

नगर-औरंगाबाद रोडवर कंटेनर-कार अपघातात एक ठार; एक जखमी

googlenewsNext

नेवासा : कंटेनर-कार अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाट्यानजीक बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.
विठ्ठल पांडुरंग कौसे (वय ३२, रा.कावलगाव, ता.पूर्णा, जि. परभणी) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर  अनिल सखाराम पारसकर (रा.हल्ली मुक्काम यमुना नगर, निगडी, ता.मावळ, जि.पुणे) हे जखमी झाले आहेत. पारसकर व कौसे हे स्वीप्ट कारमधून ( एम.एच.-१२ एन. एक्स.-७९८१) मंगळवारी नांदेड येथून पुण्याकडे निघाले होते. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद येथून पुण्याकडे जात असताना देवगड फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला कंटेनर (एम.एच.४६, बी.बी.- २८८९)  उभा होता. कंटेनरच्या मागील बाजूस कुठल्याही प्रकारचे इंडिकेटर तसेच रिफ्लेक्टर नसल्याने कार कंटेनरवर आदळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणारे नागरिक त्वरित घटनास्थळी येऊन दोघांना कारमधून बाहेर काढले. मात्र चालक विठ्ठल कौसे हा जागीच ठार झाला. तर जखमी अनिल पारसकर यांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अनिल पारसकर यांच्या जबाबावरून कंटेनरच्या चालकाविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: One killed in container-car accident on Nagar-Aurangabad Road; One was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.