उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी बेमुदत रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:19 AM2021-07-25T04:19:52+5:302021-07-25T04:19:52+5:30

शासकीय अधिकारी व कर्मचारी हे काम करीत असताना वैयक्तिक लाेभ टाळून समाजाच्या हितासाठी काम करीत असतात. कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी ...

Officer on indefinite leave to protest against beating of Deputy Chief Minister | उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी बेमुदत रजेवर

उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी बेमुदत रजेवर

Next

शासकीय अधिकारी व कर्मचारी हे काम करीत असताना वैयक्तिक लाेभ टाळून समाजाच्या हितासाठी काम करीत असतात. कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी अत्यंत कर्तव्यनिष्ठ काम करीत आहे. तसेच त्यांच्यावर कोरोनाचा अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यांना अशा पद्धतीने नगरसेवक व कार्यकर्ते यांच्याकडून शिवीगाळ व मारहाण अभिप्रेत नाही. अशा परिस्थितीत राज्य संवर्गातील अधिकारी व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे बाबत अनास्था तयार झाली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील गोर्डे, दिगंबर वाघ, पल्लवी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चाकणे, रोहित सोनवणे, बालचंद्र उंबरजे, तुषार नालकर, नितेश मिरीकर, दीपक बडगुजर, प्रमोद ढोरजकर, सोमनाथ नारळकर, अरुण तोगे, सुमित काळोखे, महेश काकडे, ज्ञानेश्वर जगताप, श्वेता शिंदे, ऋतुजा पाटील, बी. एम. पारधी यांच्या सह्या आहेत.

.......

फोटो२४ - जिल्हाधिकारी निवेदन - कोपरगाव

Web Title: Officer on indefinite leave to protest against beating of Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.