नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजार पार;  एकाच दिवसात ५३५ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:21 PM2020-08-02T12:21:23+5:302020-08-02T12:22:04+5:30

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (आॅगस्ट) कोरोना बाधित रुग्णवाढीचा उच्चांक झाला. एकाच दिवशी ५३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ५०८ झाली आहे. तर शनिवारी आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्युू झाला.

The number of corona victims in Nagar district has crossed five and a half thousand; 535 positives, six deaths in a single day | नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजार पार;  एकाच दिवसात ५३५ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू

नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजार पार;  एकाच दिवसात ५३५ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू

Next

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी (आॅगस्ट) कोरोना बाधित रुग्णवाढीचा उच्चांक झाला. एकाच दिवशी ५३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ५०८ झाली आहे. तर शनिवारी आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्युू झाला.

शनिवारी अहमदनगर शहरात सर्वाधिक १८६, श्रीगोंद्यामध्ये ६० रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २१७ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता १७९५ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली.  शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी दुपारपर्यंत २४ रुग्ण बाधित आढळून आले होते. त्यामध्ये नगर शहर (९), नेवासा (१३), जामखेड (२) अशा २४ रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर आणखी १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. नेवासा (१), नगर शहर (२), अकोले (७) जणांचा समावेश आहे. 

 अँटीजेन चाचणीत २८४ जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर (२७), राहाता (९), पाथर्डी (२५), नगर ग्रामीण (१५), श्रीरामपुर (१२),  कॅन्टोन्मेंट (१३), नेवासा (२०), श्रीगोंदा (६०), पारनेर (१७), राहुरी (६), शेवगाव (४३), कोपरगाव (१२), जामखेड (२२) आणि कर्जत (३) अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, नगर शहर (१७५), संगमनेर (५), राहाता (१३), पाथर्डी (४), नगर ग्रामीण (५), श्रीरामपूर (४), कॅन्टोन्मेंट (१), नेवासा (१), श्रीगोंदा (१), पारनेर (४), शेवगाव (२), कोपरगाव (१) आणि कर्जत येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
 

Web Title: The number of corona victims in Nagar district has crossed five and a half thousand; 535 positives, six deaths in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.