भाजपवर नव्हे, फडणवीस टीमवर नाराज-एकनाथ खडसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:27 PM2020-01-11T17:27:00+5:302020-01-11T17:27:56+5:30

भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली.

Not on BJP, angry over Eknath Khadse on Fadnavis team | भाजपवर नव्हे, फडणवीस टीमवर नाराज-एकनाथ खडसे 

भाजपवर नव्हे, फडणवीस टीमवर नाराज-एकनाथ खडसे 

Next

नेवासा : भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली.
शनिवारी दुपारी खडसे सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात महापूजा करून शनिला अभिषेक घातला. तद्नंतर त्यांनी चौथºयावर जाऊन शनि दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर उपस्थित होते.
खडसे म्हणाले, मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षापासून माझ्यावर अन्याय होत आहे. पक्षाकडून नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणा-या गटाकडून माझ्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत परळी येथील सभेत काही मुद्दे सांगितले. याविषयी योग्य वेळी अधिक सविस्तर बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.
खिचडी सरकार टिकणार नाही
 विधानसभेत जनतेने भाजप-सेना युतीला कौल दिला होता. परंतु, सरकार स्थापन करताना दोन्ही पक्षाकडून चुका झाल्या. त्यामुळे सरकार स्थापन झाले नाही. सध्याचे सरकार हे तीन विचारांची खिचडी असून ते फार काळ टिकणार नाही, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Not on BJP, angry over Eknath Khadse on Fadnavis team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.