नगर जिल्ह्यात रुग्णवाढीचे सर्वाधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 05:22 AM2020-08-02T05:22:47+5:302020-08-02T05:22:57+5:30

अँकर । सरासरी १० टक्के रुग्णवाढ : इतर शहरांच्या तुलनेत परिस्थिती चिंताजनक

Nagar district has the highest incidence of morbidity | नगर जिल्ह्यात रुग्णवाढीचे सर्वाधिक प्रमाण

नगर जिल्ह्यात रुग्णवाढीचे सर्वाधिक प्रमाण

Next

सुदाम देशमुख

अहमदनगर : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग दर सर्वाधिक आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता नगर जिल्ह्यात रोज सरासरी १० टक्के रुग्ण वाढत आहेत. जुलै महिन्यात दोन दिवस नगरचा रुग्णवाढीचा दर १७ टक्क्यांच्या पुढे गेला होता. महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत नगरमधील रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सुरवातीच्या काळात सरासरी २० ते ३० रुग्ण वाढत होते. त्यावेळी रुग्णवाढीचे हे प्रमाण एक टक्क्यांच्या खाली होते. मात्र १५ जुलैनंतर नगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते आहे. १५ ते १९ जुलै या काळात १०० च्या आसपास रुग्ण वाढले होते. मात्र २० जुलैला तब्बल ३५०, २२ जुलैला ४२८, २६ जुलैला ३५० रुग्ण वाढले आहेत. १६ जुलै आणि २० जुलैला तर कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर हा १७ टक्क्यांवर गेला आहे.
एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशातील ११ जिल्ह्यांतील कोरोना वाढीचा दराचा वेग हा १०
टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ एकच जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग दर हा १० टक्के इतका आहे, असे निरीक्षण एका राष्ट्रीय स्तरावरील सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आले होते.
नगर जिल्ह्याच्या अवतीभोवती असलेले पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई या शहरांमधील रुग्णवाढीच्या वेगाशी नगर जिल्ह्यातील रुग्णवाढीच्या वेगाशी तुलना केली असला इतर शहरांपेक्षा नगरचाच रुग्णवाढीचा दर दहापटीने अधिक असल्याचे दिसून आले आहे.

का वाढला दर? : जुलै महिन्यामध्ये खासगी प्रयोगशाळा आणि अँटीजेन किट उपलब्ध झाल्याने कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी हाती घेण्यात आली. एकाच दिवसात जास्तीत जास्त चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ९५ टक्के रुग्णांना लक्षणे नसली तरी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.

कोरोना रुग्णांच्या
वाढीचा वेग (३० जुलै)
शहर वाढलेले वाढीचा
रुग्ण दर
मुंबई १२०० १.०६ टक्के
पुणे १८८९ ३.३१ टक्के
औरंगाबाद १६६ १.६२ टक्के
नाशिक ३१९ ३.४१ टक्के
सोलापूर ९७ १.९२ टक्के
अहमदनगर ४२८ ९.२७ टक्के
 

Web Title: Nagar district has the highest incidence of morbidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.