Municipal district polls: 5 to 6 percent | नगर जिल्ह्यात १२ ते १५ टक्के मतदान
नगर जिल्ह्यात १२ ते १५ टक्के मतदान

नगर जिल्ह्यात १२ ते १५ टक्के मतदान
अहमदनगर : सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२ ते १५ टक्के मतदान झाले. वरुणराजाने उघडीप दिल्याने मतदानासाठी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मतदानकेंद्राच्या बाहेर चिखल झाल्याने मतदारांनी थोडी गैरसोय झाली. प्रमुख उमेदवारांनी सकाळी आठच्या आतच मतदानाचा हक्क बजावला. पाऊस नसल्याने आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने मतदार सकाळीच घराबाहेर पडले होते. 
नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी ११६ उमेदवार मैदानात आहेत. सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली. पावसाने उघडीप दिल्याने मतदार सकाळीच घराबाहेर पडलेले होते. मतदान केंद्रावर काही ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या, तर काही ठिकाणी शुकशुकाट होता. रात्री झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचलेले होते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झालेला होता. मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मतदारांना चिखल तुडवत जावे लागले. मंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह प्रमुख उमेदवारांनी सकाळीच मतदान केले.


 


Web Title: Municipal district polls: 5 to 6 percent
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.