जिल्हाधिकारी साहेब....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:38+5:302021-05-07T04:22:38+5:30

नाहीतर तुमची अर्धी टीम प्रत्यक्ष व्हिजिटवर तरी पाठवा. तुमचे अधिकारी जर आले तर निदान लसीचे नियोजन तरी सुरळीत होईल.. ...

Mr. Collector .... | जिल्हाधिकारी साहेब....

जिल्हाधिकारी साहेब....

Next

नाहीतर तुमची अर्धी टीम प्रत्यक्ष व्हिजिटवर तरी पाठवा.

तुमचे अधिकारी जर आले तर निदान लसीचे नियोजन तरी सुरळीत होईल..

खुशाल वर्तमानपत्रात बातमी देता, की रोज तीनशे जणांची नावे केंद्रावरील बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येतील.

त्यांनाच लस मिळेल..

म्हणजे आपली नावे आली की नाही हे पाहण्यासाठी तीन हजार लोकांनी गर्दी करायची का?

ज्येष्ठ नागरिक जे दोन महिने घराबाहेर पडले नाहीत

त्यांनीही लशीच्या आशेने हेलपाटे मारायचे का?

आणि या गर्दीत त्यांनी पॉझिटिव्ह व्हायचे का?

काही नियोजन आहे का नाही

लोक शांत आहेत. ज्येष्ठ नागरिक कितीही त्रास होत असेल तरी चकरा मारत आहेत.

काही थकले आहेत. चालायला येत नाही.

संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

आणि तुम्ही चालू द्या तुमच्या मिटिंगा...

लस असेल, नसेल, नावे कोणाची आहेत, नाहीत.

हे सारं एक दिवस आधी सोशल मीडियाद्वारे प्रकाशित करा

म्हणजे लोकांचा त्रास तरी वाचेल

एका ठिकाणी सांगता अंतर ठेवा,

अन तुम्हीच लोकांना गर्दीत ढकलताय...

अरे काय तुमचं ढिसाळ नियोजन...

मला तर वाटू लागलंय आता ,

तुमची लोकं जिथे मलईचं काम आहे तिथेच जास्त लक्ष देतात का ?

अशा खूप साऱ्या बातम्या, आरोप, वाचण्यात आले होते.

तिथेही प्रकरण दाबायचे कसं हे ही तुम्हा लोकांना चांगलंच समजतं..

तुम्हा लोकांनी काय 'स्मशान उत्सव'' साजरा करायचा ठेका घेतलाय का?

उगीचच दिवस भरवायचे म्हणून भरवू नका....

थोडी शरम तरी असू द्या...

गलेलठ्ठ पगार मिळतोय सरकारकडून...

निदान योग्य नियोजन असू दया..

जयंत येलूलकर, माजी नगरसेवक, अहमदनगर

Web Title: Mr. Collector ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.