सासू-सास-याला मारहाण; चौघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:25 PM2020-01-22T16:25:46+5:302020-01-22T16:26:18+5:30

पत्नीच्या माता-पित्यांना मारहाण करणा-या जावयासह चौघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे़

Mother-in-law-beating; Strong labor for all four | सासू-सास-याला मारहाण; चौघांना सक्तमजुरी

सासू-सास-याला मारहाण; चौघांना सक्तमजुरी

Next

अहमदनगर : पत्नीच्या माता-पित्यांना मारहाण करणा-या जावयासह चौघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे़. जिल्हा न्यायाधीश ए.एम़.शेटे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. 
पावलस कचरू गायकवाड (रा़ खरवंडी कासार,), संजय छबू हिवाळे (रा़ चेंबूर, वाशिनाका मुंबई), पेतरस कचरू गायकवाड व योहान कचरू गायकवाड (रा़ खरवंडी कासार ता़ पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या चौघांची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील रहिवासी वृषाली किसन ठुबे हिचा १३ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपी पावलस कचरू गायकवाड याच्यासोबत विवाह झाला होता. पावलस हा वृषालीला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने तिने आरोपीविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पावलस व इतर तिघा आरोपींनी ३ डिसेंबर २०१४ रोजी वृषाली हिच्या घरी जाऊन तिच्या चुलत भावास धक्काबुक्की करत त्याला घरात कोंडून टाकले. तसेच यावेळी वृषालीचे आई-वडील किसन विष्णू ठुबे व मंदा ठुबे यांना मारहाण केली़. यावेळी आरोपींनी वृषाली हिला जबरदस्तीने वाहनातून घेऊन गेले. याप्रकरणी वृषाली हिचा चुलत भाऊ भानुदास विठ्ठल ठुबे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तत्कालीन पोलीस निरीक्षक एस़आऱ जांभळे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेले साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली़. या गुन्ह्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ पुष्पा गायकवाड यांनी काम पाहिले. 

Web Title: Mother-in-law-beating; Strong labor for all four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.