मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मोहिनीराज यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:09+5:302021-03-05T04:22:09+5:30

नेवासा : ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मुख्य दिवशी गुरुवारी (दि.४) सायंकाळी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मंदिरातच काल्याची हंडी ...

Mohiniraj Yatra festival in the presence of few devotees | मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मोहिनीराज यात्रोत्सव

मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मोहिनीराज यात्रोत्सव

Next

नेवासा : ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मुख्य दिवशी गुरुवारी (दि.४) सायंकाळी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मंदिरातच काल्याची हंडी फोडण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात काल्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराजांचा मोठ्या प्रमाणावर होणारा यात्रोत्सव यावर्षी रद्द झाल्याने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. फक्त मंदिरातच उत्सवमूर्तीचे शास्त्रोक्त पद्धतीने कार्यक्रम मंदिरात पार पडले.

यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे नायब तहसीलदार नारायणराव कोरडे यांच्या हस्ते उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वडार समाजाच्या कावड परंपरेत खंड पडू नये म्हणून वडार समाजबांधवांनी यावर्षी मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष करत व सामाजिक अंतराचे पालन करत मोजक्याच युवकांनी प्रवरासंगम येथून पायी चालत आणलेल्या गंगाजलाने श्री मोहिनीराजांच्या उत्सवमूर्तीस जलाभिषेक घालण्यात आला.

सायंकाळी मानकरी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

----

०४ मोहिनीराज

नेवासा येथील मोहिनीराज यात्रेनिमित्त काल्याची दहीहंडी गुरुवारी फोडण्यात आली.

Web Title: Mohiniraj Yatra festival in the presence of few devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.