मोदींनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:30+5:302021-01-20T04:22:30+5:30

करार पद्धतीने शेती, बाजार समितीवरील गंडांतर आणि इतर अनेक मुद्दे हे शेतकरीविरोधी आणि व्यापारीधार्जिणे आहेत. ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या ...

Modi should not see the end of farmers | मोदींनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये

मोदींनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये

Next

करार पद्धतीने शेती, बाजार समितीवरील गंडांतर आणि इतर अनेक मुद्दे हे शेतकरीविरोधी आणि व्यापारीधार्जिणे आहेत. ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात व्यापार सुरू केला आणि संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांची शेकडो वर्षे लूट केली. ब्रिटिशांनी नीळ उत्पादन करणे सक्तीचे केले होते असाच प्रकार करून व्यापारी पुन्हा एकदा सध्याच्या केंद्र सरकारच्या शेती कायद्याच्या आधारे शेतकऱ्यांना वेठीला धरतील. मोदींचे नेतृत्व व्यापारीधार्जिणे आहे; परंतु भारत देशात शेतकरी मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्या मतांमुळे ते आज पंतप्रधान आहेत याचा विसर त्यांना पडला आहे. सध्या दिल्ली परिसरात देशातील शेतकरी बांधवांनी जीवघेण्या थंडीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेल्या ५० दिवसांत अनेक शेतकरी सरकारच्या कठोर कारवाईमुळे दगावले आहेत. असंतोष वाढून देशाची शांतता भंग पावण्याच्या आत सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी अक्षय परभणे, अभिजित शेटे, सचिन सापते, संभाजी कदम, यशवंत तोडमल, अभिषेक म्हस्के, भूषण चिंचोरे आदींसह फेसबुकव्दारे पुणे येथून शुभम मिसाळ, मंगेश कदम, औरंगाबाद येथील वाहेद शेख आदी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

-----------

फोटो- १९स्माईलिंग

दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य अल्पसंख्याक विभागाचे सचिव मुन्ना चमडेवाले यांनी मंगळवारी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे अन्नत्याग आंदोलन केले.

Web Title: Modi should not see the end of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.