नगर शहरातील माळीवाडा व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 08:57 PM2020-06-04T20:57:16+5:302020-06-04T20:57:26+5:30

अहमदनगर :  अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसर कन्टेंन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. १७ जूनपर्यंत हे क्षेत्र येण्या-जाण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.

Maliwada and surrounding areas declared as containment zones | नगर शहरातील माळीवाडा व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित

नगर शहरातील माळीवाडा व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित

Next

अहमदनगर :  अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसर कन्टेंन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. १७ जूनपर्यंत हे क्षेत्र येण्या-जाण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.

असा आहे कन्टेंन्टमेंट झोन
फुलसौंदर चौक माळीवाडा - पंचपीर चावडी-जुना बाजार रोड-मदवाशाह पीर-बारातोटी कारंजा इवळे गल्ली चौक-वरवंडे गल्ली-सौभाग्य सदन - विळदकर गल्ली-पारगल्ली-विशाल गणपती मंदिर उत्तर बाजू-आशा प्रोव्हीजन स्टोअर्स-फुलसौंदर चौक हा भाग कन्टेंमेट झोन घोषित करण्यात आला आहे.
---
हा असेल बफर झोन
संत कैकाडी महाराज व्यापारी संकुल-बगदादी खानावळ-खाटीक गल्ली-सवेरा हॉटेल-नागरे गल्ली-माणकेश्वर गल्ली-भिस्त गल्ली-शेरकर गल्ली-गोंधळे गल्ली-इवळे गल्ली-कौठीची तालीम-दवकर गल्ली-अमन पाटील रोड-माळीवाडा वेस-भोपळे गल्ली-संत कैकाडी महाराज संकुल हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 
-----
आजपासून या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्या १७ जून २०२० रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदभार्तील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या कालावधीत कन्टेन्मेंट झोनमधील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा इ. आणि बफर झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा इत्यादी बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 

Web Title: Maliwada and surrounding areas declared as containment zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.