नगर जिल्ह्यात भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने मैदानात उतरवले नवे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:01 AM2019-10-03T00:01:25+5:302019-10-03T00:02:23+5:30

भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने यावेळी नवीन चेहरे मैदानात उतरवले आहेत.

Maharashtra Vidhan sabha 2019: Kiran Lahmte, Nilesh Lanke, Jagtap, Kale, Dhakane is NCP candidate in Nagar district | नगर जिल्ह्यात भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने मैदानात उतरवले नवे चेहरे

नगर जिल्ह्यात भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने मैदानात उतरवले नवे चेहरे

Next

अहमदनगर: भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने यावेळी नवीन चेहरे मैदानात उतरवले आहेत. अकोल्यात वैभव पिचड यांच्या विरोधात डॉ. किरण लहामटे यांना तर पारनेरमध्ये निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीने आपल्या ७७ उमेदवारांची याची बुधवारी रात्री जाहीर केली. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात डॉ. किरण लहामटे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे, शेवगावमध्ये प्रताप ढाकणे, पारनेरमध्ये निलेश लंके, अहमदनगर शहरात विद्यमान आमदार संग्राम जगताप, तर कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राहुरी, श्रीगोंदा व नेवासा मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही 77 जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पंढरपूर भारत भालके, श्रीवर्धनमधून खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे, मुरबाड येथून प्रमोद हिंदुराव, कोरेगाव शशिकांत शिंदे, कल्याण पूर्व प्रकाश तरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ, ठाणे मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आलं आहे. 

या 77 जणांच्या पहिल्या यादीत विद्यमान 19 विधानसभा आणि 1 विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधून नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आली आहे. शिवाय या यादीत नव्याने प्रवेश केलेले कॉंग्रेस, शिवसेना,भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पहिल्या यादीतच राष्ट्रवादीने अनेक तरुण व नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने भाजप - सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: Kiran Lahmte, Nilesh Lanke, Jagtap, Kale, Dhakane is NCP candidate in Nagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.