लोकमत संवाद/ शहराच्या पर्यटनाचा अजेंडा ठरवावा लागेल - जयंत येलूलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:21 PM2020-05-30T21:21:33+5:302020-05-30T21:22:41+5:30

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

Lokmat Sanwad / City Tourism Agenda has to be decided - Jayant Yelulkar | लोकमत संवाद/ शहराच्या पर्यटनाचा अजेंडा ठरवावा लागेल - जयंत येलूलकर

लोकमत संवाद/ शहराच्या पर्यटनाचा अजेंडा ठरवावा लागेल - जयंत येलूलकर

Next

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणाले,  शहराच्या एका वर्धापनदिनी आम्ही भिस्तबाग महालावर विद्युत रोषणाई केली होती. त्यावेळी ही वास्तू इतकी अप्रतिम दिसत होती की ते चित्र पाहून नगरकर आचंबित झाले. सर्व ऐतिहासिक वास्तूंचे आपण असे जतन केले व कल्पकता वापरुन त्यांचा विकास केला तर पर्यटक नगरला गर्दी करतील. भुईकोट किल्ला पाहण्यासाठी दूरवरून लोक येऊ शकतात. तेथे वीज, पाणी यांचा वापर करुन रात्री काही सांस्कृतिक ‘शो’ सुरु करता येऊ शकतो. या किल्ल्याभोवती मोठे खंदक आहेत त्याचाही अप्रतिम वापर करुन घेता येईल. पर्यटनस्थळे विकसित झाली की आपोआप छोटे-मोठे व्यवसाय, हॉटेल, रिक्षा, ट्रॅव्हल एजन्सी यांना रोजगार मिळेल. आपण गावातील रस्ते चांगले केले व पर्यटनस्थळे विकसित केली तरी शहर कितीतरी बदलेल. हे काम फार अवडघ नव्हे. केवळ इच्छाशक्ती हवी आहे. या वर्षभराचा अजेंडा ठरविण्यासाठी ‘लोकमत’ने खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. भाराभर अपेक्षा नोंदवून उपयोग नाही. माझ्या मते पर्यटनाचा आराखडा आपण निर्माण केला व वाडिया पार्कचा गुंता सोडविला तरी दोन मोठे प्रश्न मार्गी लागतील. नगरची पर्यटन स्थळे विकसित केल्यास शिर्डी, शिंगणापूरला जाणारे पर्यटक नगरमध्ये थांबतील. त्यातून अर्थचक्र फिरु शकेल, असेही ते म्हणाले.    
अहमदनगर शहराच्या विकासाबाबत आजवर चर्चाच खूप झाली. आता ठोस कृती कार्यक्रम हवा आहे. या वर्षात  किमान नगरच्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारने कृती आराखडा ठरविला तरीही विकासाच्यादृष्टीने मोठे पाउल पडेल. हे वर्ष पर्यटनस्थळांच्या विकासाभोवती केंद्रित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Lokmat Sanwad / City Tourism Agenda has to be decided - Jayant Yelulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.