गांधी घराण्याने देशाची सेवा केली, त्यांच्या हत्या हा त्याग नाही का? - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 02:49 PM2019-04-18T14:49:57+5:302019-04-18T14:56:34+5:30

नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

Lok Sabha Election 2019 Sharad Pawar says Gandhi family served the nation | गांधी घराण्याने देशाची सेवा केली, त्यांच्या हत्या हा त्याग नाही का? - शरद पवार

गांधी घराण्याने देशाची सेवा केली, त्यांच्या हत्या हा त्याग नाही का? - शरद पवार

Next
ठळक मुद्दे'नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली.'हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली.

कर्जत (जि. अहमदनगर) - नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थानचे राज्य चालवायचे असेल तर प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. ते समजावून घेतले पाहिजेत. मात्र प्रश्न समजावून घेणारी टीम पंतप्रधानांकडे नाही.

भाजपा कार्यकर्त्यांना छावण्या - रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या सभेत सर्व रंगांचे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश असतो. मोदी साहेब हे फक्त शरद पवार यांच्यावरच बोलतात. पवार हेच सर्व पक्षांना एकत्रित करू शकतात. म्हणून मोदी यांना शरद पवार यांची भीती वाटत असावी. कर्जमाफी दिली म्हणजे उपकार केल्यासारखे ते बोलत आहेत. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा कोणालाही लाभ झाला नाही.काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना सरसकट कर्जमाफी दिली गेली.

निवडणुकीच्या आधी काही दिवस सरकारने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. भाजपाचा कार्यकर्ता असेल तिथेच पालकमंत्र्यांनी छावण्या दिल्या. कोणत्याही धान्याला हमीभाव नाही. देशाचा कांदा निर्यात करण्याऐवजी पाकिस्तानचा कांदा खाण्याची वेळ भाजपा सरकारने आणली आहे. स्वार्थासाठी ते शेतकरी, पक्ष, तरुणांना विसरून सुजय विखे भाजपात गेले. राजकारणासाठी ते सर्वांनाच विसरले. खासदार झाले तर ते जनतेला देखील विसरतील. त्यामुळे जगताप यांनाच संसेदत पाठवा, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.

Web Title: Lok Sabha Election 2019 Sharad Pawar says Gandhi family served the nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.