४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:21 PM2019-09-22T14:21:25+5:302019-09-22T14:22:06+5:30

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात ३५३ मतदान केंद्र असून, त्यापैकी ४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. विधानसभेसाठी १ लाख ६९ हजार १४६ पुरुष व १ लाख ५० हजार ४१२ महिला असे एकूण ३ लाख १९ हजार ५५८ मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली़

The location of 2 polling stations has been changed | ४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलले

४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलले

Next

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात ३५३ मतदान केंद्र असून, त्यापैकी ४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. विधानसभेसाठी १ लाख ६९ हजार १४६ पुरुष व १ लाख ५० हजार ४१२ महिला असे एकूण ३ लाख १९ हजार ५५८ मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली़
नष्टे म्हणाल्या, शनिवारी दुपारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी ३६ क्षेत्रीय अधिकारी, १ हजार ५५३ अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतदान केंद्रनिहाय संपर्क आराखडा तयार करण्यात आला आहे. तहसील कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली असून निवडणुकीसाठी लागणारे विविध आॅफलाईन व आॅनलाईन परवाने एकाच कक्षातून देण्यात येणार आहे. मतदार सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ आचारसंहिता भंगाबाबत मतदारांच्या तक्रारी असल्यास भारत निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील नागरिकांसाठी असणारे सिव्हिजील अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले़

Web Title: The location of 2 polling stations has been changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.