मुलांना व्यक्त होऊ द्या, त्यांची घुसमट समजून घ्या; कोरोना काळात बालक-पालक सुसंवाद महत्त्वाचा

By अरुण वाघमोडे | Published: July 8, 2020 04:19 PM2020-07-08T16:19:35+5:302020-07-08T16:20:49+5:30

बिनधास्त सर्वत्र बागडणारी मुले गेल्या तीन महिन्यांपासून घरातच आहेत. अशा परिस्थितीत मुलांची घुसमट होऊ नये, ते कुठल्याही वाईट सवयीचे बळी ठरू नयेत, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा़. त्यांच्याशी मनमोकळा सुसंवाद साधावा़. मुलांना व्यक्त होऊ द्यावे, त्यांच्याही अडचणी समजून घ्याव्यात, असे मत ‘लोकमत’ आॅनलाइन परिचर्चेत सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते व संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

Let the children express themselves, understand their nest; Child-parent harmony is important during the Corona period | मुलांना व्यक्त होऊ द्या, त्यांची घुसमट समजून घ्या; कोरोना काळात बालक-पालक सुसंवाद महत्त्वाचा

मुलांना व्यक्त होऊ द्या, त्यांची घुसमट समजून घ्या; कोरोना काळात बालक-पालक सुसंवाद महत्त्वाचा

googlenewsNext

आॅनलाईन परिसंवाद

अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातील लहान मुलांच्या दैनंदिन जीवनातही मोठा बदल झाला आहे. बिनधास्त सर्वत्र बागडणारी मुले गेल्या तीन महिन्यांपासून घरातच आहेत. अशा परिस्थितीत मुलांची घुसमट होऊ नये, ते कुठल्याही वाईट सवयीचे बळी ठरू नयेत, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा़. त्यांच्याशी मनमोकळा सुसंवाद साधावा़. मुलांना व्यक्त होऊ द्यावे, त्यांच्याही अडचणी समजून घ्याव्यात, असे मत ‘लोकमत’ आॅनलाइन परिचर्चेत सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते व संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

या परिचर्चेत बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक नवनाथ सूर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख व स्नेहालयचे प्रकल्प संचालक वैजनाथ लोहार हे सहभागी झाले होते.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनपेक्षित वातावरणाचा सर्वांच्याच जीवनावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम झाला आहे. यात अल्पवयीन मुले हाही महत्त्वाचा घटक आहे. मागील तीन महिन्यात चाइल्ड लाइनकडे १५० मुलांनी तक्रारी केल्या. घरात मारहाण, अल्पवयीन विवाह, घरात खायला काही नाही, शेजारी राहणाºयाकडून त्रास अशा स्वरूपाच्या या तक्रारी आहेत. दुसरीकडे मुलांना मोबाईल गेमचे व्यसन, चिडचिडेपणा, अतिप्रमाणात हट्ट करणे, पॉर्न साईटचे सर्चिंग अशाही समस्यांना अनेक पालक सामोरे जात आहेत. अनेक मुलांचे मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत. मुलांचा एकटेपणा, मुलांकडून पालकांच्या जास्त अपेक्षा, मुलांना समजून न घेणे अथवा मुलांच्या वाईट सवयींकडे दुर्लक्ष करणे अशा विविध कारणांमुळे मुलांबाबत अन्याय, अत्याचारासह विविध  समस्या निर्माण होत असल्याचे मत परिचर्चेतून व्यक्त झाले.

मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. अत्याचाराचे बळी ठरणाºया मुलांना न्याय देण्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच सामाजिक संस्था कार्यरत आहेत. अल्पवयीन मुला- मुलींवर मात्र असे वाईट प्रसंग येऊ नयेत, यासाठी सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून मुलांसाठी वेळ राखून ठेवावा. बालक-पालकांमध्ये चांगला सुसंवाद असेल तर वेळीच अनेक समस्यांना आळा बसू शकतो.

    - हनीफ शेख,  अध्यक्ष, बालकल्याण समिती

लॉकडाऊन काळात चाईल्ड लाइनकडे आलेल्या मुलांच्या १५० तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. मुलांना कुणाकडून काही त्रास होत असेल तर त्यानी १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच पालकांनीही आपल्या मुलांबाबत सजग राहणे गरजेचे आहे. मुलांना कोणाकडून काही त्रास होत नाही ना? याचेही बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे.

    - नवनाथ सूर्यवंशी, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक.

बहुतांशी वेळेस घरात मुलांना गृहीत धरले जाते़. त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही़ मुलाने आपले मत व्यक्त केले तर मोठी माणसे त्याला गप्प बसायला सांगतात. मुलांसोबत असे वागणे पूर्णत: चुकीचे आहे. सध्या कोरोनामुळे मुलांना घरातच थांबावे लागत असल्याने पालकांनी आणखी खबरदारी घेणे गरजेचे आहे. घरातील मुलांना वेळ देऊन त्यांना पालकांनी समजून घ्यावे.

    - वैभव देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

आज अनेक मुलांच्या हातात स्मार्टफोन आहेत़. आपला मुलगा त्या फोनचा कसा वापर करत आहे, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मुलगा काही मानसिक तणावाखाली आहे का? कुणाचा दबाव त्याच्यावर आहे का, तो भीतीदायक वातावरणात आहे का, या गोष्टीही पालकांनी समजून घेतल्या तर अनेक समस्या निर्माण होणार नाहीत.

-वैजनाथ लोहार, प्रकल्प संचालक स्रेहालय

Web Title: Let the children express themselves, understand their nest; Child-parent harmony is important during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.