रणखांबमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; तीन बकरे, पंधरा कोंबड्या केल्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 05:05 PM2021-01-20T17:05:44+5:302021-01-20T17:06:43+5:30

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील एका शेतकर्‍याच्या घराजवळील संरक्षक जाळीमध्ये प्रवेश करुन बिबट्याने तीन बकरे व पंधरा कोंबड्या ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

Leopard swarms in battlefields; Three goats, fifteen hens | रणखांबमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; तीन बकरे, पंधरा कोंबड्या केल्या फस्त

रणखांबमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; तीन बकरे, पंधरा कोंबड्या केल्या फस्त

Next

घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील एका शेतकर्‍याच्या घराजवळील संरक्षक जाळीमध्ये प्रवेश करुन बिबट्याने तीन बकरे व पंधरा कोंबड्या ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

 रणखांब गावांतर्गत असलेल्या गुळवेवस्ती येथे सुभाष गुळवे हे शेतकरी राहतात. त्यांनी घरापासून काही अंतरावरच संरक्षक जाळी उभारलेली आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शेळ्या व बकरे जाळीमध्ये सोडली होती. पहाटेच्या सुमारास बिबट्याने जाळीमध्ये घुसून तीन बकरांसह पंधरा कोंबड्या ठार केल्या. सकाळी शेतकरी गुळवे हे जाळीजवळ गेले असता त्यांना बकरे व कोंबड्या मृतावस्थेत दिसल्या.

  तत्काळ त्यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे गणपत मुळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. 

Web Title: Leopard swarms in battlefields; Three goats, fifteen hens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.