Leopard attack on farmer in Khospuri Shivara; Four goats | खोसपुरी शिवारात बिबट्याचा शेतक-यावर हल्ला; चार शेळ्या केल्या फस्त 

खोसपुरी शिवारात बिबट्याचा शेतक-यावर हल्ला; चार शेळ्या केल्या फस्त 

केडगाव : नगर तालुक्यातील खोसपुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तर बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे. ही घटना रविवारी (२४ जून) दुपारी रोजी घडली. 

खोसपुरीजवळील इमामपूर घाटातील डोंगरपायथ्याला येथील शेतकरी भरत गेणुजी देवकर (वय ५०) हे रविवारी जनावरे चारण्यासाठी गेले होते. त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या चार शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत झाल्याचे जखमी भरत देवकर यांनी सांगितले. 

बिबट्याचा खोसपुरी शिवारात मुक्तसंचार असून वस्त्यांवर राहणा-या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ही या परिसरात बिबट्याचे वास्तव्य दिसून आलेले आहे. 


 

Web Title: Leopard attack on farmer in Khospuri Shivara; Four goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.