पाझरणारे ज्ञानामृत मराठी भाषेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:41 AM2021-02-28T04:41:12+5:302021-02-28T04:41:12+5:30

येथील न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ...

The leaking knowledge is in Marathi language only | पाझरणारे ज्ञानामृत मराठी भाषेतच

पाझरणारे ज्ञानामृत मराठी भाषेतच

Next

येथील न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे होते. मराठीची परंपरा जिवंत ठेवायची असेल, तर मातृभाषेला पर्याय नाही. त्यासाठी दैनंदिन व्यवहार मराठीमधून झाले पाहिजेत, असे सोनवणे यावेळी म्हणाले. मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचली असून, मराठीच्या जतन-संवर्धनासाठी आज वेगवेगळ्या माध्यमांतून होणारा मराठीचा वापर वाढला पाहिजे, अशी भूमिका उपप्राचार्य डाॅ. बी.एच. झावरे यांनी मांडली.

या कार्यक्रमात कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी.बी. सागडे यांनी कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि साहित्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले. डॉ. मेहबूब सय्यद यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. नवनाथ येठेकर यांनी केले. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नीलेश लंगोटे, डॉ. वैशाली भालसिंग यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. अशोक गायकवाड, डॉ. किसन अंबाडे, डॉ. पी.टी. शेळके, प्रा. हरिदास गावित, प्रा. शिवाजी लवंगे, प्रा. निकिता खोसे, प्रा. मयूर रोहोकले, प्रा. दत्तात्रय नकुलवाड, प्रा. टेकाळे व मराठी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो २७ मराठी

ओळी -

न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कवी सुभाष सोनवणे यांचा सत्कार करताना कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी.बी. सागडे. समवेत मराठी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, डॉ. मेहबूब सय्यद, डॉ. नवनाथ येठेकर, डॉ. वैशाली भालसिंग, डाॅ. डी.बी. कोल्हे आदी.

Web Title: The leaking knowledge is in Marathi language only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.