माणिकदौडी येथे कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:47+5:302021-05-18T04:22:47+5:30

माणिकदौंडी : माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथील रत्न जैन विद्यालयात सोमवारी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी तीन लाख ...

Kovid Center started at Manikdaudi | माणिकदौडी येथे कोविड सेंटर सुरू

माणिकदौडी येथे कोविड सेंटर सुरू

Next

माणिकदौंडी : माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथील रत्न जैन विद्यालयात सोमवारी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी तीन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली.

उद्घाटन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या हस्ते करण्यात आले. लोकांच्या सहभागातून ऊसतोडणी कामगार, कोळसा कामगार व खाण कामगार यांच्या आरोग्यसेवेसाठी माणिकदौंडीसह परिसरातील गावे वाड्या-वस्त्या, लमाण तांडे येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी संघटित होऊन हे कोविड सेंटर सुरू केले. रत्न जैन विद्यालयाने इमारत देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. गावातील आरोग्यमित्र युवकांच्या संघटनेने कोविड सेंटरवर स्वयंसेवकांनी काम करण्याची संकल्पना मांडली आहे. वैद्यकीय अधिकारी व मेडिकल असोसिएशन, किराणा दुकानदार संघटना यांनीही आर्थिक मदत दिली आहे.

तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, डॉ. गौरी डोंगरे, सुभाष कुलकर्णी, प्रशांत तोरवणे, सुनील ओहळ, के.सी. चव्हाण, उपसरपंच समीर पठाण, ज्येष्ठ समाजसेवक के.सी. राठोड, राधाकिसन कर्डिले, पोपट पठाण, अविनाश पालवे, संजय चितळे, राजू मेरड, सुनील पाखरे उपस्थित होते.

---

प्रशासनाला हवी नागरिकांची मदत..

यावेळी केकाण म्हणाले, माणिकदौंडीसारख्या डोंगराळ भागातील लोकांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमात मदतीचा मोठा वाटा उचलला आहे. कोविडमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन धोक्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रशासनाला लोकांच्या सहभागाची गरज आहे. कोविड या लढाईत आपल्याला विजयी व्हायचे आहे. इथे माणुसकीच्या भावनेतून आपण एकत्रित आलो आहोत.

---

१७ माणिकदौंडी

माणिकदौंडी येथील कोविड सेंटरचे उद‌्घाटन करताना बंजारा समाजातील ज्येष्ठ समाजसेवक के.सी. राठोड व अधिकारी. (छायाचित्र : संदीप शेवाळे)

Web Title: Kovid Center started at Manikdaudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.