पूर्ववैमनस्यातून एकावर चाकू हल्ला; घोडेगाव येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:18 PM2020-02-28T18:18:12+5:302020-02-28T18:19:52+5:30

दोन वर्षांपूर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीमुळे तुरुंगात रहावे लागले. याचा राग आल्याने एकावर चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.२६ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. याप्रकरणी सोनई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

Knife attack on one of the former; Events at Ghodegaon | पूर्ववैमनस्यातून एकावर चाकू हल्ला; घोडेगाव येथील घटना

पूर्ववैमनस्यातून एकावर चाकू हल्ला; घोडेगाव येथील घटना

Next

सोनई : दोन वर्षांपूर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीमुळे तुरुंगात रहावे लागले. याचा राग आल्याने एकावर चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.२६ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. याप्रकरणी सोनई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 
अनिल अर्जुन चौगुले (रा.घोडेगाव, ता.नेवासा) यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घोडेगाव येथील जुना चांदा रोडवर आरोपी निलेश मधुकर केदार (रा.घोडेगाव, ता.नेवासा) मला म्हणाला, तू दोन वर्षापूर्वी दिलेल्या तक्रारीमुळे मी बरेच दिवस जेलमध्ये होतो. असे म्हणत मला मारहाण करुन हातातील चाकूने दंडावर वार केले. यावेळी त्याने जिवे मारण्याची धमकीही दिली, असे चौघुले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत.

Web Title: Knife attack on one of the former; Events at Ghodegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.