कर्जतकरांचा शेवगावकरांना स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:25 AM2021-03-01T04:25:41+5:302021-03-01T04:25:41+5:30

शेवगाव : कर्जत येथून पैठणकडे निघालेल्या स्वच्छता अभियान सायकल दिंडीतील स्वच्छतादूतांनी स्वच्छतेचा संदेश रविवारी शेवगावकरांनाही दिला. छत्रपती शिवाजी महाराज ...

Karjatkar's message of cleanliness to Shevgaonkar | कर्जतकरांचा शेवगावकरांना स्वच्छतेचा संदेश

कर्जतकरांचा शेवगावकरांना स्वच्छतेचा संदेश

Next

शेवगाव : कर्जत येथून पैठणकडे निघालेल्या स्वच्छता अभियान सायकल दिंडीतील स्वच्छतादूतांनी स्वच्छतेचा संदेश रविवारी शेवगावकरांनाही दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ब्राह्मण गल्लीदरम्यान स्वच्छता अभियान राबविले. सायकल दिंडीचे शहरात उत्स्फूर्तपणे ठिकठिकाणी स्वागत केले.

कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान सायकल दिंडीचे कर्जत-धामणगाव-पाथर्डी मार्गे शेवगावतील संत गाडगेबाबा चौकात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास आगमन झाले. यावेळी रोटरी क्लब, विविध सामाजिक संस्था, नगरपरिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

छत्रपती शिवाजी चौक ते ब्राह्मण गल्ली

दरम्यान, दिंडीतील स्वच्छतादूतांनी स्वच्छता अभियान राबविले. दिंडीमध्ये ८ वर्षांच्या मुलापासून ते ८३ वर्षांचे आजोबा, सर्वसामान्य नागरिक, शिक्षक, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, डॉ.गणेश चेके, रोटरीचे डॉ.संजय लड्डा, प्रा.किसनराव माने, बाळासाहेब चौधरी, प्राचार्य दिलीप फलके, भागनाथ काटे, प्रवीण लाहोटी, डॉ.पुरुषोत्तम बिहाणी, स्नेहलता लबडे, बाळासाहेब डाके, प्रा.काकासाहेब लांडे, प्रा.अण्णासाहेब दिघे, सचिन खेडेकर, स्वाती ढवळे आदींनी स्वागत केले.

शेवगाव पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सायकल दिंडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, सायकल दिंडी पैठणकडे रवाना झाली.

या दिंडीत मुख्याधिकारी गोविंद जाधव, तात्या क्षीरसागर, भीमा जंगम, नितीन देशमुख, विजय तोरडमल, अभय बोरा, भाऊसाहेब रानमाळ, राहुल नवले, तानाजी पाटील, अशोक नेवसे, फारूक बेग, अण्णा म्हस्के, नंदकुमार लांगोरे, सुनील भोसले, दत्तात्रय कोपनर, गिरीश गुंड, निरंजन काळे, सचिन धांडे, साळुंके मेजर, मरकड मेजर, पत्रकार मुन्ना पठाण, विशाल तोरडमल आदी सहभागी झाले आहेत.

---

२८ शेवगाव सायकल दिंडी

कर्जत येथून पैठणकडे निघालेल्या स्वच्छता अभियान सायकल दिंडीचे शेवगाव शहरात स्वागत करण्यात आले.

Web Title: Karjatkar's message of cleanliness to Shevgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.