पारनेर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:52 PM2019-08-25T16:52:29+5:302019-08-25T16:52:34+5:30

मतदारसंघातील बहुतांश भागात वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठीच बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले

Karjat-Jamkhed: Audit of MLAs' promises | पारनेर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

पारनेर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

googlenewsNext

पारनेर : मतदारसंघातील बहुतांश भागात वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठीच बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले. मात्र तेथून इतर गावांत वीजपुरवठा जोडलेला नाही. त्यामुळे ते उपकेंद्र सध्या तरी नावालाच ठरले आहे. याशिवाय अळकुटी परिसरातील काही भागातही विजेचा वारंवार लपंडाव सुरू असतो. काही बिघाड झाल्यास दोन ते तीन दिवस दुरुस्ती होत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

आमदाराचे नाव : विजय औटी
मतदारसंघ : पारनेर-नगर

टॉप 5 वचनं
1 जलयुक्त शिवार योजना राबवणार
2 रस्ते विकासाला प्राधान्य
3 वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणणार
4 आदिवासींना जमिनी देणार
5 वीज पुरवठा सातत्याने मिळणार

वचनांचं काय झालं?
1 जलयुक्तमधून अनेक बंधारे उभारले
2 काही भागात वीज पुरवठ्याचा प्रश्न कायम
3 कुकडी पाणी नियोजनात अपयश
4 काही आदिवासींना जमीन दिली
5 अनेक भागात रस्त्यांची कामे पूर्ण

हे घडलंय...
1 ३२ हजार संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी
2 प्रमुख रस्त्यांचे बळकीटकरण
3 विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी १५ वीज उपकेंद्र
4 आदिवासींना हक्काच्या जमिनी मिळवून दिल्या
5 मुळा नदीवर पारनेर-राहुरीला जोडणारा पूल उभारला

हे बिघडलंय...
1 मतदारसंघात शेतीसाठी शाश्वत पाणी स्त्रोत नाही.
2 १६ गावांची पाणी योजना विजबिलाअभावी बंद
3 १४ गावांना कालव्याचे नियमित पाणी नाही
4 सुपा एमआयडीसीत गुंडागर्दी वाढली

दुष्काळी भागात शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविणे गरजेचे होते. शेती समृद्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल. मतदारसंघात नद्या, ओढे, नाले जोडण्याचा प्रकल्प करायला हवा. -अनिल देठे, नागरिक, पारनेर

सुपा एमआयडीसीमध्ये भूमिपुत्रांना नोकºया मिळणे आवश्यक आहे. सध्या युवकांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे आवश्यक होते. दुष्काळामुळे दूध धंदा संकटात सापडल्याने दूध दरासाठी लढा देण्याची गरज होती. -विक्रमसिंह कळमकर,वाडेगव्हाण


विधीमंडळातील कामगिरी
विजय औटी यांनी विधीमंडळामध्ये राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या वृद्ध, निराधार, विधवा यांना वेळेवर अनुदान मिळण्यासाठी प्रश्न उपस्थित करून मार्गी लावला. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अत्यावश्यक कायद्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारला भाग पाडले. मागील वर्षी विजय औटी यांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यातून त्यांनी मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी आणला.

पाच वर्षांत काय केलं?
दुष्काळी पारनेर-नगर मतदारसंघात बंधारे बांधून शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न. सर्व रस्त्याचे मजबुतीकरण, ग्रामीण भागातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जोडून दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली. पळशी, तास, वनकुटे भागातील शेतकरी, आदिवासी यांना हक्काची जमीन मिळवून दिली. पारनेर-राहुरी तालुका जोडणाºया मुळा नदीवरील तास येथील पुलाची उभारणी.

119 किलोमीटर अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. मात्र तरीही मतदारसंघातील काही भागातील रस्त्यांची कामे होणे बाकी आहे. काही ठिकाणी खडीकरण झाले आहे, त्याच्या मजबुतीकरणाची मागणी आहे. त्यासाठी अधिकाधिक निधी मिळायला हवा. विशेषत: मतदारसंघात समाविष्ट असलेल्या नगर तालुक्यातील काही भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

मतदार संघाला काय हवं
1 कुकडी, पिंपळगाव जोगा पाणी नियोजन
2 सुपा एमआयडीसीत भूमिपुत्रांना नोकरी
3 दूध संघाचे पुनरूज्जीवन व्हावे
4 वीजपुरवठ्यातील अडथळा दूर व्हावा

का सुटले नाहीत प्रश्न?
कुकडी व पिंपळगाव जोगातून पारनेर तालुक्यातील १४ गावांना कालव्यातून पाणी मिळते, पण जुन्नर तालुक्यातील गावे पाणी घेत असल्याने पारनेरमधील अळकुटी व शेजारील गावांना कमी पाणी पुरवठा होतो. कान्हूर पठार भागाला हक्काचे एक टीएमसी पाणी केवळ निधीअभावी मिळत नाही. पठार भागावर पाणी पोहचविण्यासाठी विजेचा होणारा खर्च लक्षात घेता ही योजना फक्त कागदावरच राहिली.

त्यांना काय वाटतं?
मतदारसंघात आपण विकास कामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवार योजना राबवून सर्वाधिक बंधारे बांधले. शेततळी उभारली. पाऊस चांगला झाल्यास याचे परिणाम खूप चांगल्या प्रमाणात दिसून येतील. शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले. दुर्गम भागातील रस्ते व मोठे पूल उभारणी करून वंचित घटकातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यातून तेथील शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. - विजय औटी, आमदार

 

 

Web Title: Karjat-Jamkhed: Audit of MLAs' promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.