इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान प्रकरणी २ डिसेंबरला सुनावणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 02:28 PM2020-11-25T14:28:03+5:302020-11-25T14:29:49+5:30

समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल आहे. संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. परंतु ती आता २ डिसेंबर रोजी होणार आहे.

Indorikar Maharaj's controversial statement hearing on December 2 | इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान प्रकरणी २ डिसेंबरला सुनावणी 

इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान प्रकरणी २ डिसेंबरला सुनावणी 

Next

संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल आहे. संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. परंतु ती आता २ डिसेंबर रोजी होणार आहे.

इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी शुक्रवारी (१९ जून) संगमनेर न्यायालयात फिर्याद दिली होती.

या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. इंदोरीकर महाराजांचे वकील म्हणून के. डी. धुमाळ काम पहात आहेत. या प्रकरणात अंनिसच्यावतीने अ‍ॅड. रंजना पगार गवांदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर इंदोरीकर महाराजांचे वकील धुमाळ यांनी हरकत घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी (१८ सष्टेंबर) सुनावणीवेळी वकिलांमध्ये युक्तीवाद होवून न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी अंनिसच्यावतीने दाखल केलेला अर्ज मान्य केला होता. इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणा-या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणारे अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी त्यांच्या कार्यालयाला मला हे काम पाहण्याची इच्छा नसल्याचे कळविले आहे.

२५ नोव्हेंबर होणारी सुनावणी पुढे ढकलली असून पुढील तारीख २ डिसेंबर तारीख दिली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. कोल्हे यांनी काम पाहण्याची इच्छा नसल्याचे कळविल्यानंतर या प्रकरणात सरकारी वकील म्हणून आता कोणाची नियुक्ती केली जाते. याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

Web Title: Indorikar Maharaj's controversial statement hearing on December 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.