क्रीडा अधिकारी नावंदे यांची तातडीने बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 04:40 PM2019-08-14T16:40:31+5:302019-08-14T16:42:08+5:30

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे हिटलरशाहीसारख्या मनमानी पध्दतीने कारभार करत आहे. मंत्र्याच्या नावाने धमक्या देवून शासकिय यंत्रणेला चुकीची माहिती देऊन खोेट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत.

Immediately replace sports officer names | क्रीडा अधिकारी नावंदे यांची तातडीने बदली करा

क्रीडा अधिकारी नावंदे यांची तातडीने बदली करा

googlenewsNext

अहमदनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे हिटलरशाहीसारख्या मनमानी पध्दतीने कारभार करत आहे. मंत्र्याच्या नावाने धमक्या देवून शासकिय यंत्रणेला चुकीची माहिती देऊन खोेट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या कारभाराविरोधात सर्व संघटना आंदोलनात उतरल्या असून नावंदे यांच्या बदली करावी अन्यथा शनिवारी(१७ आॅगस्ट) रोजी सक्कर चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा क्रीडा संघटनांनी दिला. प्रा.सुनिल जाधव, प्रा. संजय साठे, राजेंद्र कोतकर, रावसाहेब बाबर यांनी पत्रकार परिषदेत आपली भुमिका जाहीर केली.
नावंदे यांच्या मनमानी कारभारामुळे शालेय स्पर्धेवर क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटना यांनी बहिष्कार टाकला आहे. नावंदे यांना स्पर्धेसाठी कोणतेही सहकार्य केले जाणार नाही. संघटनाचे प्रश्न आणि संकुलातील समस्या याबाबत वेळोवेळी चर्चा करूनही नावंदे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्या सर्वांनाच अरेरावाची भाषा वापरतात. आमचा प्रवेश शुल्कास विरोध नाही. मात्र त्या बदल्यात सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात. अगोदर सुविधा देऊन त्यानंतर शुल्क आकारावे. ६०-४० धोरणासही आमचा विरोध आहे. जलतरण तलावाची दिलेली निविदा प्रक्रियाही संशयास्पद आहे. क्रीडा संकुलातील वसतीगृह त्यांनी सुरु करावे. आजपर्यत एकदाही क्रीडा संघटनाची बैठक झालेली नाही. आजपर्यत एकही क्रीडा स्पर्धा पार पडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या या कारभाराविरोधात, त्यांच्या बदलीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुनिल जाधव आणि राजेंद्र कोतकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बदलीच्या मागणीसाठी जिल्हाधिका-यांकडे निवेदनही देण्यात आले आहे.

Web Title: Immediately replace sports officer names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.