मी पुन्हा नगरला येईल -अकाली निधनाने आशालता वाबगावकर यांची इच्छा अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 01:08 PM2020-09-22T13:08:49+5:302020-09-22T13:10:03+5:30

आशालता वाबगावकर ५ वर्षांपूर्वी अहमदनगर येथे आयोजित स्व. शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभासाठी  प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन झाले होते. या महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण देखील त्यांच्या हस्ते झाले होते. 

I will come to the city again - with the untimely demise, the wish remained unfulfilled. | मी पुन्हा नगरला येईल -अकाली निधनाने आशालता वाबगावकर यांची इच्छा अपूर्णच

मी पुन्हा नगरला येईल -अकाली निधनाने आशालता वाबगावकर यांची इच्छा अपूर्णच

googlenewsNext

 

अहमदनगर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या जेष्ठ सिने अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे मंगळवारी पहाटे ५ वा. सातारा येथील प्रतिभा या खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. सोनी मराठी वहिनी व कस्तुरी शहा आर्ट्स प्रस्तुत 'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेल्या महिन्याभरापासून त्या सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथील खानविलकर फार्म हाऊस येथे थांबल्या होत्या. चित्रीकरणा दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. आणि सातारा येथे उपचार सुरू असतांनाच त्यांचे दुःखद निधन झाले. संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे नगरी सिनेमा च्या टिमला तीव्र दुःख झाले असून त्यांनी ५ वर्षांपूर्वी आशालता वाबगावकर या नगरला एका कार्यक्रमासाठी आल्या असल्याच्या आठवणींना उजाळा दिला.

आशालता वाबगावकर ५ वर्षांपूर्वी अहमदनगर येथे आयोजित स्व. शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभासाठी  प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नगरी सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२, २३, २४ मे २०१५ रोजी येथील महेश चित्रमंदिर येथे आयोजित दादा कोंडके चित्रपट महोत्सव, एकपात्री अभिनय स्पर्धा, विविध लोककला स्पर्धा तसेच नृत्य, गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमांना आशालता वाबगावकर यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली होती. आणि नगरी कलावंतांचे त्यांनी तोंड भरून कौतुक देखील केले होते. त्यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन झाले होते. त्याच बरोबर या महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण देखील त्यांच्या हस्ते झाले होते. 

 

आशालता वाबगावकर यांच्यासह इतर मान्यवरांची निवास व्यवस्था  नगर येथील हॉटेल संकेत मध्ये करण्यात आली होती. आपल्या ३ दिवसाच्या अहमदनगर येथील वास्तव्य काळात नगरकरांनी केलेल्या आदरातिथ्याने त्या भारावून गेल्या होत्या. या भेटीत निर्माते अतुल ओहोळ यांनी आशालता यांना शनिशिंगणापूर व श्री क्षेत्र शिर्डी साईबाबांचे दर्शनही घडविले होते. २५ मे रोजी त्या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आणि जातांना मी पुन्हा नगरला येईल अशी इच्छा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. परंतु त्यांच्या अकाली निधनाने त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

 

फोटो:- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नगरी सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने महेश चित्रमंदिर येथे आयोजित स्व.शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करतांना जेष्ठ सिनेअभिनेत्री आशालता वाबगावकर समवेत सिने अभिनेते विजय पाटकर, महोत्सव समन्वयक भगवान राऊत, अध्यक्ष अंबादास नरसाळे, कार्याध्यक्ष संजय पाटील, नगराध्यक्षा राजश्री ताई ससाणे व दिलीप दळवी.

 

  

Web Title: I will come to the city again - with the untimely demise, the wish remained unfulfilled.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.