प्रवरा कालव्याजवळच्या वटवृक्षांची शंभरी पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:21 PM2019-06-16T13:21:49+5:302019-06-16T13:22:01+5:30

कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे, कालव्यांच्या भरावाला मजबूती राहावी, जमिनीची धूप कमी व्हावी.

Hundreds of trees near the river Pravara crossed! | प्रवरा कालव्याजवळच्या वटवृक्षांची शंभरी पार!

प्रवरा कालव्याजवळच्या वटवृक्षांची शंभरी पार!

Next

गणेश आहेर
लोणी : कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे, कालव्यांच्या भरावाला मजबूती राहावी, जमिनीची धूप कमी व्हावी. वास्तवाला आल्यानंतर गर्द सावलीत आरोग्याच्या दृष्टीने भरपूर आॅक्सिजन मिळावा, अशा एक ना अनेक.. उदात्त हेतूने ब्रिटिशांनी लावलेल्या प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कडेला असलेल्या शेकडो वटवृक्षांच्या झाडांनी आता शंभरी पार केली आहे.
प्रवरा नदीवरील ओझर (ता.संगमनेर) बंधाºयापासून प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांना सुरूवात होते. उजवा कालव्याचा शेवट देवळाली प्रवरा येथे होतो. ३३ मैलाचा म्हणजे ५३ किलोमीटर अंतराचा हा कालवा आहे. सोनगाव आणि देवळाली येथे असलेल्या विश्रामगृहाजवळ मोठ्या प्रमाणावर हे वडांचे डेरेदार वटवृक्ष आहेत. डाव्या कालव्याचा शेवट हा बेल पिंपळगाव येथे आहे. या कालव्यानजीक आश्वी, लोणी, खंडाळा, वडाळा या ठिकाणी असलेल्या विश्रामगृहाच्या परिसरातील महाकाय वटवृक्ष सर्वांचाच आकर्षणाचा विषय ठरत आहे. ४८ मैल म्हणजे ७७ किलोमीटर अतंराचा हा डावा कालवा आहे.
साधारणपणे १९१०-१२ साली लावलेल्या या वडाच्या झाडांचा लागवडीचा साक्षीदार आज कोणीही हयात नसला तरी डेरेदार अशी महाकाय झालेली ही वडाची वृक्ष आज वाटसरू, पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान बनली आहेत. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी ज्यावेळी कालव्यांची कामे सुरू केली होती. त्यावेळी कामावर देखरेख करण्यासाठी काही ठराविक अंतरावर बांधलेल्या विश्रामगृहांच्या परिसरात या वटवृक्षाची संख्या अधिक आहे.पण सद्यस्थितीत पाटबंधारे विभागाचे फारसे लक्ष नसल्याने या महाकाय वृक्षांची छाटणी सुरूच आहे.

वडाचे झाड अमर आहे. म्हणूनच स्त्रिया या झाडांप्रमाणे आपल्या पतीला अमरत्व मिळावे, या भावनेतून त्याची पूजा करतात. या झाडांच्या पारंब्या नेहमी वाढणाºया असतात. परत या पारंब्यांनाच पालवी फुटते. आपल्या पतीचे आयुष्य पारंब्यांप्रमाणेच वाढते राहो, अशीही धारणा स्त्री वर्गात मानली जाते म्हणूनच मनोभावे या झाडाची पूजा केली जाते. या झाडांच्या पारंब्या नेहमी वाढतात. जमिनीला टेकल्यानंतर परत त्यांना पालवी फुटते. हे झाड दोन ते अडीच एकर इतकी जागाही व्यापते. पेमगिरी (ता.संगमनेर) येथील वडाचे झाड याचे उत्तम उदाहरण आहे. वडाचे झाड हे धार्मिकतेसह औषधींसाठी उपयुक्त असल्याने त्याचे जतन करणे गरजचे आहे. - प्रा.डॉ.अनिल वाबळे, वनऔषधी संशोधक, लोणी.


ब्रिटिशकालिन असलेल्या विश्रामगृहांच्या परिसरातच ही वटवृक्ष आहेत. पर्यावरणाला पूरक असा हेतू त्याकाळी वटवृक्ष लागवडीमागे होता. शिवाय कालव्याच्या कामादरम्यान विश्रामगृहाभोवती गारवा राहावा असाही उद्देश ब्रिटिशांचा असावा म्हणून मोठ्या प्रमाणावर ही वटवृक्ष विश्रामगृह परिसरात लावले असावेत.
-संजय रामदास गणेश, पाटबंधारे शाखा अभियंता, लोणी

कालव्याच्या कामावेळी कालव्यांच्या भरावाचा सर्व्हिस रोड म्हणून ब्रिटिश वापरत होते. पुढे याच ठिकाणी विश्रामगृहे बांधली गेली असावीत. भराव खचून नुकसान होऊ नये, वर्दळीच्या ठिकाणी कालवे फुटू नये म्हणून ही वटवृक्ष लावली असावीत. पर्यावरण जतन करणे हा उदात्त हेतू होताच आणि आजही आहे.
- संजय सिनारे, पाटबंधारे शाखा अभियंता, देवळाली प्रवरा.

Web Title: Hundreds of trees near the river Pravara crossed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.