हल्लेखोर माकडासाठी लावला हनी ट्रॅप; वनविभागाने अनोखी लढविली शक्कल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 10:50 AM2022-08-13T10:50:06+5:302022-08-13T10:50:21+5:30

बिरेवाडी, साकूर परिसरात माकडाने लहान मुलांवर हल्ले सुरु केले.

Honey trap set for attacking monkey; The forest department fought in a unique way | हल्लेखोर माकडासाठी लावला हनी ट्रॅप; वनविभागाने अनोखी लढविली शक्कल 

हल्लेखोर माकडासाठी लावला हनी ट्रॅप; वनविभागाने अनोखी लढविली शक्कल 

Next

- शेखर पानसरे 

संगमनेर (जि. अहमदनगर) : २५ हून अधिक लहान मुलांवर हल्ले करत दहशत माजवणाऱ्या एका माकडाला जाळ्यात  पकडण्यासाठी वनविभागाने अनोखी शक्कल लढविली. चक्क एका माकडीणीला आणत त्या माकडावर प्रेमाचे जाळे टाकले. माकडही तिच्या प्रेमाला भुलले आणि त्याच वेळी त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. माकडावर केलेल्या या ‘हनी ट्रॅप’मुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून हा अनोखा ट्रॅप सर्वत्र चर्चेचा  विषय झाला आहे. 

बिरेवाडी, साकूर परिसरात माकडाने लहान मुलांवर हल्ले सुरु केले. साकुर येथील सानवी इघे आणि नगमा मोमीन या दोन लहान मुलींना माकडाने चावा घेतल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, हल्ला करणे असे प्रकार सुरू असताना विशेषत: हे माकड लहान मुलांना लक्ष्य करत होते. एका विद्यालयात ते घुसले व विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. माकडाला पकडण्याची ग्रामस्थांची मागणी जोर धरत होती. वनविभागाचे अधिकारी त्याला पकडण्यासाठी करत असलेले प्रयत्न फोल ठरत होते. 

कसे केले जेरबंद? 

एका वस्तीवर माकड असल्याचे समजताच तिथे माकडीणीला आणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. काही खाद्यपदार्थही ठेवले. काही वेळाने तेथे माकड आलेच. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी माकडावर नजर ठेवून होते. वेळ साधून कर्मचाऱ्याने गनच्या साहाय्याने डॉट मारला, त्याला पकडण्यासाठी जाळी टाकून पकडण्यात आले. 

दहशत निर्माण करणारे माकड कुणीतरी पाळलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याला सोडून दिलेले असावे. माकडाला पकडण्यासाठी माकडीणीला आणणे फायदेशीर ठरले. माकडाला पकडल्यानंतर त्याच्यावर पशुवैद्यक उपचार करत आहेत. 
- सुभाष सांगळे, वनपाल, संगमनेर वनपरिक्षेत्र विभाग ३

Web Title: Honey trap set for attacking monkey; The forest department fought in a unique way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.