एतिहासिक दस्तावेज आता एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:37+5:302021-06-19T04:15:37+5:30

अहमदनगर : अहमदनगर शहराला ऐतिहासिक, सामाजिक, अध्यात्मिक परंपरा असून, शहातील सर्व दस्तावेजांचे संगणीकरण करण्याच्या सूचना संबबंधांना देण्यात आल्या आहेत. ...

Historical documents now with one click | एतिहासिक दस्तावेज आता एका क्लिकवर

एतिहासिक दस्तावेज आता एका क्लिकवर

Next

अहमदनगर : अहमदनगर शहराला ऐतिहासिक, सामाजिक, अध्यात्मिक परंपरा असून, शहातील सर्व दस्तावेजांचे संगणीकरण करण्याच्या सूचना संबबंधांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगरचे ऐतिहासिक दस्तऐवज एका क्लिकवर उपलब्ध होतील, अशी माहिती सभागृहनेते रविंद्र बारस्कर यांनी दिली.

सभागृहनेते बारस्कर यांनी महापालिकेच्या रेकॉर्ड विभागाला नुकतीच भेटी दिली. त्यावेळी ते बोलत होते. इतिहासप्रेमी भूषण देशमुख, सहायक आयुक्त दिनेश सिनारे, संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी, दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान, रेकॉर्ड विभागाचे प्रमुख विजय बालानी आदी उपस्थित होते. रवींद्र बारस्कर म्हणाले की, नगर शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. ऐतिहासिक दस्तावेज केल्यास पुढील पिढीला ही माहिती सहज उपलब्ध होईल. जुने दस्तावेज महापालिकेच्या रेकॉर्ड विभागात अडगळीत पडून आहे. हे दस्तावेज असेच पडून राहिल्यास ते खराब होतील. त्यामुळे या दस्तावेजांचे संगणीकरण करण्याची कार्यवाही तातडीने करा. त्यासाठी शहरातील इतिहास तज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची समिती तयार करून दस्तावेज जतन करण्याच्या कामाला गती दिली जाईल, असे बारस्कर म्हणाले.

....

सूचना: फोटो बारस्कर नावाने आहे

Web Title: Historical documents now with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.