निर्यातक्षम उत्पादन निर्मितीसाठी शेतक-यांना हायटेक करा; ङॉ.व्ही.व्ही. सदामते यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:58 PM2020-05-29T16:58:35+5:302020-05-29T17:00:47+5:30

शेतक-यांंना डेअरी, पोल्ट्री, शेळीपालन, निर्यातक्षम कृषी उत्पादने तयार करण्यासाठी हायटेक व्हावे लागणार आहे. त्यासाठी शेतकºयापर्यंत नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार व त्यासाठी प्रसार माध्यमांचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे माजी सल्लागार डॉ. व्ही. व्ही. सदामते यांनी केले. 

Hi-tech farmers to produce exportable produce; N.V.V. Sadamate's advice | निर्यातक्षम उत्पादन निर्मितीसाठी शेतक-यांना हायटेक करा; ङॉ.व्ही.व्ही. सदामते यांचा सल्ला

निर्यातक्षम उत्पादन निर्मितीसाठी शेतक-यांना हायटेक करा; ङॉ.व्ही.व्ही. सदामते यांचा सल्ला

Next

राहुरी :   शेतक-यांंना डेअरी, पोल्ट्री, शेळीपालन, निर्यातक्षम कृषी उत्पादने तयार करण्यासाठी हायटेक व्हावे लागणार आहे. त्यासाठी शेतकºयापर्यंत नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार व त्यासाठी प्रसार माध्यमांचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे माजी सल्लागार डॉ. व्ही. व्ही. सदामते यांनी केले. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने प्रसार माध्यमांचा कृषी तंत्रज्ञान प्रसारात प्रभावी वापर या विषयावर एक आठवड्याचे आॅनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या आॅनलाईन प्रशिक्षणाच्या सांगता शुक्रवारी झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सदामते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी.विश्वनाथा हे होते. 

 सुधारित तंत्रज्ञान, उपलब्ध संसाधने व वेगवेगळ्या योजना यांचा शेतक-याला फायदा झाला पाहिजे. सुधारित तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहोचण्यासाठी भविष्यात विस्तार यंत्रणा प्रामुख्याने आयसीटी व समाज माध्यमे यांच्या आधारावर चालतील. शेतीमध्ये तंत्रज्ञान प्रसारात प्रामुख्याने सरकारचे कृषी खाते, निमसरकारी संस्था, सुधारित पद्धतीने शेती करणारे शेतकरी व कृषी विज्ञान केंद्रे यांचा महत्त्वाचा वाटा असतो. एखादे नवीन तंत्रज्ञान शेतक-र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विस्ताराच्या मॉडेलमध्ये आपल्याला सातत्याने बदल करावा लागेल. यामध्ये तरुण शेतकरी, महिला शेतक-यांचा प्रतिसाद याचा विचार करुन नवीन तंत्रज्ञानामध्ये आवश्यक ते बदल करावेत, असेही सदामते यांनी सांगितले.

डॉ. मुकुंद शिंदे यांनी कास्ट प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रशिक्षणाचे संयोजन सचिव डॉ. मिलिंद अहिरे यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ, डॉ. मनोहर धादवड यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुभाषचंद्र शिंदे यांनी मानले. 

Web Title: Hi-tech farmers to produce exportable produce; N.V.V. Sadamate's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.