Guide students to the Poxo Act at Takshila School | तक्षिला स्कूलमध्ये पॉक्सो अ‍ॅक्टबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

तक्षिला स्कूलमध्ये पॉक्सो अ‍ॅक्टबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

या वेबिनारमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश रेवती देशपांडे व जिल्हा न्यायाधीश कल्पना पाटील मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. समाजात बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृतीची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे आपली काळजी घ्यावी व जागरुक रहावे हे यासाठी या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शाळेचा विकास हे ध्येय ठेऊन शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी सांगितले.

रेवती देशपांडे यांनी योग्य आहाराने शरीराचे स्वास्थ्य उत्तम राहते, शरीराचे स्वास्थ्य उत्तम असल्यास तो विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकत असल्याचे सांगितले. न्यायाधीश कल्पना पाटील यांनी बालकांवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची माहिती व समज देखील महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पॉक्सो) या विषयी बोलताना कलम ७ व ११ यानुसार शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श केल्यास त्याचबरोबर दुसऱ्याला अश्‍लील चित्र पाठविणे, अश्‍लील हावभाव करणे व बोलणे हे या कायद्यांतर्गत गुन्हा ठरत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन मुबिना शेख यांनी केले. आभार तन्वीर खान यांनी मानले.

----------फोटो - ०५तक्षिला

तक्षिला स्कूलच्या विद्यार्थी व पालकांसाठी बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याविषयी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्या जयश्री मेहेत्रे व शिक्षक.

Web Title: Guide students to the Poxo Act at Takshila School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.